ZIM vs IND 2nd ODI : भारताची मालिकेत विजयी आघाडी

Zimbabwe vs India 2nd ODI Live Cricket Score KL Rahul  Shardul Thakur
Zimbabwe vs India 2nd ODI Live Cricket Score KL Rahul Shardul Thakuresakal
Updated on

Zimbabwe vs India 2nd ODI : भारताने झिम्बाब्वेचे 162 धावांचा आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत दुसरा वनडे सामना 5 विकेट्सनी जिंकला. झिम्बाब्वेने भारताची अवस्था 4 बाद 97 धावा अशी करून चांगली झुंज दिली होती. मात्र संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा (25) यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या समिप पोहचवले. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने प्रत्येकी 33 धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने 38 धावा देत 3 बळी टिपले. भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना 22 ऑगस्टला होणार आहे.

सामन्याचे लाईव्ह अपडेट

संजू - दीपक हुड्डाची भागीदारी भारताचा मालिका विजय

भारताची अवस्था 4 बाद 97 धावा अशी झाली असताना संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली. दीपक हुड्डा 25 धावा करून बाद झाला. अखेर संजू सॅमसनने 26 व्या षटकात विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने नाबाद 39 धावा केल्या.

97-4 : झिम्बाब्वेचे भारताला धक्क्यावर धक्के

झिम्बाब्वेने भारताला 162 धावांचे आव्हान पार करताना नाकीनऊ आणले. झिम्बाब्वेने भारताची टॉप ऑर्डर उडवलीच त्याचबरोबर गेल्या सामन्यात 82 धावांची दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला देखील 33 धावांवर बाद केले. झिम्बाब्वेने भारताचे शंभरीच्या आत 4 फलंदाज माघारी धाडले.

83-3 : इशान किशन मधल्या फळीत फेल

भारताचा धडाकेबाज सलामीवीर इशान किशन झिम्बाब्वे विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मधल्या फळीत फलंदाजी करण्यास आला. मात्र तो फक्त 6 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला जाँगवेने बाद केले.

47-2 : शिखर धवन बाद, भारताला दुसरा धक्का

भारताचा दुसरा सलामीवीर शिखर धवन 33 धावांची भर घालून माघारी परतला. त्याला तनका चिवांगाने बाद केले.

5-1 : कर्णधार केएल राहुलकडून निराशा

भारताचा कर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी दोघांनीच 190 धावांचे आव्हान पार केल्याने राहुलला फलंदाजीची संधी मिळाली नाही. आशिया कपपूर्वी फलंदाजीचा सराव व्हावा यासाठी दुसऱ्या सामन्यात केएल राहुल सलामीला आला. मात्र दुसऱ्याच षटकात व्हिक्टर न्यायूचीने 5 धावांवर बाद केले.

161-10 : झिम्बाब्वेचा डाव संपला

भारताने झिम्बाब्वेचा डाव 161 धावात संपुष्टात आणला. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलने प्र्त्येकी 1 विकेट घेतली.

129-7 : शार्दुल ठाकूरचा भेदक मारा

शार्दुल ठाकूरने आपला भेदक मारा दुसऱ्या स्पेलमध्येही कायम ठेवला. त्याने ल्युक जाँगवेचा 6 धावांवर त्रिफळा उडवत आपला तिसरा आणि झिम्बावेचा सातवा फलंदाज माघारी धाडला.

105-6 : दीपक हुड्डाने दिला मोठा धक्का

सिंकदर रझासोबत पाचव्या विकेटसाठी भागीदारी रचणाऱ्या सेन विलियम्सला दीपक हुड्डाने 42 धावांवर बाद करत झिम्बाब्वेला मोठा धक्का दिला.

72-5 : शार्दुल ठाकूर, कुलदीप यादवचा भेदक मारा

दीपक चाहरच्या जागेवर संघात आलेल्या शार्दुल ठाकूरने दुसऱ्या सामन्यात भेदक मारा करत झिम्बाब्वेची अवस्था 5 बाद 72 अशी केली.

20-1 : सिराजने दिला पहिला धक्का

मोहम्मद सिराजने झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. त्याने कौतानोला 7 धावांवर बाद केले.

केएल राहुलने नाणेफेक जिंकली

केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यातील स्टार गोलंदाज दीपक चाहरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.