बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आज महामुकाबला पाहायला मिळणार आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या क्रिकेट स्पर्धेत आज या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. सलामीचा सामना गमावणाऱ्या भारतीय महिला संघाचे रविवारी पाकिस्तानविरुद्ध राष्ट्रकुल स्पर्धेतील ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात विजयी पुनरागमनाचे लक्ष्य आहे. भारत आणि पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.(Ind vs Pak Women Match)
भारत आणि पाकिस्तानला राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली सुरुवात करण्यात अपयश आले. भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून, तर पाकिस्तानने बार्बाडोसकडून हार पत्करली. पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 3 गडी राखून पराभव झाला होता. (Commonwealth Games 2022)
भारतीय संघाने काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत केले होते. तसेच उभय संघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या ११ पैकी नऊ ट्वेन्टी-२० सामन्यांत विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताचे पारडे जड मानले जात आहे.
या स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्री कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे, तर स्मृती मानधनाकडे उप कर्णधारपद असणार आहे. शेफाली वर्मा, फिरकीपटू स्नेह राणा व राजेश्वरी गायकवाड, अष्टपैलू दीप्ती शर्मा व पूजा वस्त्राकर आणि यष्टिरक्षक-फलंदाज तानिया भाटीया हा संघात कायम आहेत.
जेमिमा रॉड्रीग्ज व सब्बीनेनी मेघना यांच्यासह मेघना सिंग यांचे पुनरागमन झाले आहे. सिमरन दिल बहादूर, रिचा घोष व पूनम यादव यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.