Rainy season 2022: पावसाळ्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी कशी घ्यावी काळजी?

त्यासाठी या 10 टिप्स खास तुमच्यासाठी...
Rainy season 2022
Rainy season 2022सकाळ डिजिटल टीम
Updated on

पावसाळ्यात ( rainy season tips ) या 10 टिप्स जर तुम्ही निट फॉलो केल्या तर तुम्ही संपूर्ण पावसाळाभर तंदुरुस्त आणि सुरक्षित राहू शकता.

1) पावसाळ्यात बाहेर जाताना सोबत सतत रेनकोट किंवा छत्री ठेवावी. आणि डोके पावसाच्या पाण्याने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.

2) साचलेल्या पाण्याच्या संपर्कात येऊ नका. मग ते रस्तावर साचलेले पाणी असो किंवा पिण्याचे पाणी कोणत्याच खराब साचलेल्या पाण्याच्या संपर्कात यायचं नाही ही खबरदारी घ्यावी. कारण बहुतांश साथीचे रोग , इंफेक्शन हे खराब पाण्यामुळेच होतात.

3) विटामिन सी असलेल्या पदार्थाचे अधिक सेवन करावे.

कारण विटामिन सी हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि ताप, खोकला सर्दी झाल्यास लवकर बरे करण्यात विटामिन सी महत्त्वाची भुमिका बजावते.

4) जर तुम्ही यदाकदाचित पावसाच्या पाण्यात भिजला तर घरी आल्यानंतर पहिली गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करावी. त्यामुळे इंनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

5) हातगाडीवरचे अन्नपदार्थ खाणे टाळावेत. बाहेरचे पावसाचे वातावरण पाहून काही तरी गरमागरम खायची ईच्छा होऊ शकते. पण त्यावर ताबा मिळवावा. कारण बाहेरच्या उघड्यावरच्या अन्न पदार्थावर उडणाऱ्या माशा बसलेल्या असतात अन याच माशाआजाराला निमंत्रण देतात.

Rainy season 2022
Dudhi Bhopla Kheer : पावसाळ्यात पौष्टिक खायचं आहे? दुधी भोपळ्याची खीर ट्राय करा

6) पावसाळ्यात हाता-पायाची नखे बारीक काढावीत. कारण नखाच्या माध्यमातून सुध्दा रोग जंतू पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण आपल्या शरीराची योग्य निगा राखावी. वेळोवेळी हात पाय स्वच्छ धुवावे.

7) पावसाळयात शक्यतोवर गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करावा. कारण पावसाळ्यात तापमान एकदम खाली येते.

त्यामुळे आपोआप गरम पदार्थ खायची किंवा प्यायची ईच्छा होते. मग तेव्हा तुम्ही गरम पाणी, गरम सूप, गरम दूध, अद्रकीचा किंवा गुळाचा चहा देखील घेऊ शकता.

8) तुम्ही घातलेले कपडे आणि तुमचे शरीर सतत कोरडे ठेवा. जर तुम्ही पावसाने भिजला तर घरी आल्यावर ते कपडे काढून धुवायला टाकावे तसेच अंघोळीनंतर सुध्दा संपूर्ण अंग हे चांगले कोरडे करावे.

9) जेवनाकडे निट लक्ष दयावे. पावसाळ्यात डायटवर निट लक्ष दयावे. शरीराराला जितके पचते तितकेच अन्नपदार्थ खावे. आहारात सकस गोष्टींचा समावेश करावा.

10) घर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. पावसाळ्यात जिवजंतू पासून आपल्या घरातील प्रत्येक कोपरा सुरक्षित ठेवावा. घरातील पाण्याचे बेसिन, शौचालय हे निट साफ ठेवावे. तसेच खाद्यपदार्थ तयार करतांना आणि दाळी धान्यांची साठवून करतांना विशेष खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.