जगातील प्रत्येक व्यक्ती आरोग्यादायी जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला वाटतं की आपणही १०० वर्षांपर्यत जगायला पाहिजे. त्यासाठी काय खायला पाहिजे असाही प्रश्न आपल्याला पडत असतो. या सगळ्या प्रश्नाचं साधं आणि सरळ उत्तर म्हणजे निरोगी आहार. निरोगी आहार म्हणजे फक्त महागडं अन्न खाणं एवढंच नसून आपल्या रोजच्या अन्नातही निरोगी आणि दीर्घकाळी आयुष्याचं गुपित दडलं आहे.
अमेरिकेतील ईडन गेट (Eden's Gate) नावाच्या एका कंपनीने एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये त्यांनी जगातील सर्वांत जास्त वर्ष जगणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर संशोधन केलं आहे. त्यांनी सर्वात जास्त दिवस जगणाऱ्या महिलांच्या आहाराचा अभ्यास केला असून त्यांनी आपल्या आहारात कोणते पदार्थ वापरले आहेत याची माहिती गोळा केली आहे.
काही संशोधकांच्या मते दीर्घायुष्यासाठी आपल्याकडे खूप पदार्थ उपलब्ध असून त्यामध्ये काजू, बोरासारखे पदार्थ, मासे यांसारख्या पदार्थाचा सामावेश होतो. अशा पदार्थांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून निरोगी आयुष्यासाठी याची मदत होते.
दरम्यान ईडन गेट या कंपनीने सर्वांत वयस्कर असणाऱ्या महिलेच्या आहाराचा अभ्यास केला. जीन लुईस कैलमेट (Jeanne Louise Calment) नावाची ही महिला असून ती तब्बल १२२ वर्ष वयाची होती. १९९७ मध्ये तीचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या आहारावरील संशोधनानंतर त्यांना प्रामुख्याने खालील पदार्थांचा शोध लागला.
१) ओलिव ऑईल
रिपोर्टनुसार या महिलेच्या आहारात ओलिव ऑईलचे प्रमाण जास्त होते. ओलिव ऑईल मध्ये हेल्दी फॅट, अँटिऑक्सिडंट, अँटिइंफ्लांमेंटरी हे गुणधर्म आहेत. हे ऑईल ह्रदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
२) चॉकलेट
कैलमेट आणि हॉपकिन्स च्या म्हणण्यानुसार चॉकलेटमध्ये फक्त गोडवाच नाही तर आपल्या दीर्घायुष्यासाठी लागणारे सगळे गुणधर्म आहेत. चॉकलेट रेड वाईन सारखं ह्रदयाला निरोगी ठेवण्यासाठी मदत करते तसंच आपल्या शरीरातील रक्ताचे रक्ताभिसरण नीट राहण्यासाठी मदत करते.
३)रेड वाईन
सदर महिलेच्या आहारात रेड वाईनचाही सामावेश असल्याचं त्यांना आढळलं आहे. मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार मर्यादित प्रमाणात रेड वाईनचे सेवन केल्याने ह्रदयाच्या आरोग्यासाठी मदत मिळू शकते कारण रेड वाईनमध्ये अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहे.
टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.