मच्छिमारांना सापडली 28 कोटी रुपयांची व्हेल मासांची उलटी पण नाही झाला फायदा

केरळचे मच्छिमार करोडपती होऊ शकले नाहीत, काय आहे कारण ?
Whale Vomit)
Whale Vomit)Esakal
Updated on

केरळ मधील काही मच्छिमारांचे (Kerala Fishermen) नशीब हे उजळता उजळता राहून गेल. या मच्छिमारांना विझिंजममधून (Vizhinjam) एम्बरग्रिस या व्हेल मासांची व्होमिट मिळाले,(Whale Vomit) हे मच्छीमार या (Whale Vomit) विकून करोडपती होऊ शकले असते, पण त्यांना हा हाती लागलेला अमुलाग्र खजिना सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाली करावा लागला.

28 किलो वजनाची व्हेलची उलटी सापडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मच्छिमारांना समुद्रातून 28.400 किलोची उलटी सापडली आहे. शुक्रवारी दुपारी या मच्छिमारांना व्हेलच्या उलटी सापडली. मच्छिमारांनी ती व्हेलची उलटी लगेच किनाऱ्यावर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिली.

Whale Vomit)
Video: केरळ पर्यटन विभागाने उभारला बीचवर तरंगता पूल

कोस्टल पोलिसांनी शनिवारी पीटीआयला सांगितले की , त्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि व्हेलची उलटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीमध्ये व्हेलची उलटी जमा केली आहेत. या उलटीचा सध्या तपास सुरू आहे.

हे मच्छीमार करोडपती का होऊ शकले नाहीत?

28 कोटी रुपयांची व्हेल मासांची उलटी सापडल्यानंतरही केरळच्या मच्छिमारांना टाळ्यांशिवाय काहीच मिळाले नाही.

असं कस आहे हे ?

खरं तर, स्पर्म व्हेल, वाइल्डलाइफ़ प्रोटेक्शन कायद्यानुसार लुप्तप्राय प्रजातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारतात व्हेलच्या उलटीच्या विक्रीवर बंदी आहे.या उलटीचा वापर हा परफ्युमपासून ते औषधापर्यंत केला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारात 1 किलो व्हेलच्या उलटीची किंमत 1 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. परफ्यूममध्ये स्पर्म व्हेल व्होमीटचा वापर केला जातो. हे परफ्यूमचा सुगंध हवेत उडण्यापासून रोखते. हजारो वर्षांपासून परफ्यूममध्ये याचा वापर केला जात आहे. चीनमध्ये, व्हेलची उलटी ही लैंगिक वर्धक म्हणून वापरल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.