Relationship Mistakes: नात्यातल्या या 4 चुका ठरतात नातं बोरिंग होण्याचं कारण, आजच बदला नाहीतर

आयुष्यात अनेक चढ-उतार येतात आणि हेच आपल्या नात्याला परिपक्व होण्यासाठी मदत करतात
Relationship Mistakes in marathi
Relationship Mistakes in marathiesakal
Updated on

Relationship Mistakes: जेव्हा आपण आपल्या पार्टनर सोबत रिलेशनशीपमध्ये येतो तेव्हा अनेक स्वप्न सजवतो. दोघांच असं एक विश्व निर्माण करतो.

आयुष्यात अनेक चढ-उतार येतात आणि हेच आपल्या नात्याला परिपक्व होण्यासाठी मदत करतात. सुख, दु:ख, प्रेम या सर्व गोष्टी चांगल्या नात्यासाठी आवश्यक असतात.

अशा गोष्टी एकमेकांवरचा विश्वास वाढवण्यासाठी आणि रोमान्स टिकवण्यासाठीही कामी येतात. पण, जर तुमच्या नात्यात तुम्हाला आधी सारखा फील राहिला नाहीये आणि एकमेकांसोबत बोर होत आहे आणि तुमच्यात काही खास उरलं नाही. यावर उपाय म्हणजे नातं थांबवणं नसतं, हीच ती वेळ तूमच्या नात्याला चार्ज करण्याची.... कसं? त्यासाठी आधी या चुका सुधारा.

Relationship Mistakes in marathi
Relationship Tips : कधीतरी बोला खोटं; नातं होईल अधिक घट्ट

या चुकांमुळे नाते होते बोरिंग

उत्साहाचा अभाव

तुम्ही रोजच एकच रुटीन फॉलो करताय, उठताय, ऑफिसला जाताय, एकेमकांशी फार काही नाही तर मग कसं ते नातं टिकेल? अशा परिस्थितीत, काही रोमॅंटिक क्षण एकत्र घालवण्याचा प्रयत्न करा. नात्यातील कंटाळा दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे.

Relationship Mistakes in marathi
Relationship Tips : मुलांनो ! लग्नासाठी मुलगी शोधण्याआधी या गोष्टी समजून घ्या; तरच टिकेल नातं

प्रयत्न करा

नात्यात एकेमकांच्या आनंदासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकमेकांना गिफ्ट्स द्या, रात्री सोबत एकत्र कॉफी प्या, मूवी बघा, शनिवार रविवार फिरायला जा, नात्यात उत्साह आणण्याचा प्रयत्न करा.

Relationship Mistakes in marathi
Relationship Tips : नात्यात विश्वास कसा टिकवून ठेवाल ?

स्वतःसाठी वेळ काढा

जर तुम्हाला स्वतःलाच वेळ देता येत नसेल तर दुसऱ्याला कसा देणार? यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवा आणि तुमचे छंद पूर्ण करा, असे केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आणि स्वतःसाठी असा वेळ काढू शकाल. चांगल्या नात्यासाठी आपल्याला पर्सनल स्पेस देणं देखील गरजेचं आहे.

Relationship Mistakes in marathi
Relationship Tips : ब्रेकअपनंतर तुमचा एक्स-पार्टनर तुमच्यासोबत काय करू शकतो माहितीये का ?

रिलेशनमध्ये औपचारिकता टाळा

जर तुमच्या नात्यात जास्त औपचारिकता असेल तर त्यामुळे तुमचे नाते कंटाळवाणे होऊ शकते. तुमच्यातील नातेसंबंध सुखावह राहतील आणि तुम्ही फारसा विचार न करता प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करू शकता असा प्रयत्न करा. असे केल्याने नात्यात कोणतीही उलथापालथ होत नाही आणि दोघांनाही एकमेकांसोबत चांगले वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.