Eye Care : नववर्ष संकल्पांच्या यादीत समाविष्ट करा या ५ सवयी; डोळे राहतील निरोगी

डीआर ही अनियंत्रित मधुमेहाची परिणती आहे. यामध्ये नेत्रपडद्यातील (रेटिना) रक्तवाहिन्यांना हानी होते.
Eye Care
Eye Caregoogle
Updated on

मुंबई : २०२३ लवकरच सुरू होईल आणि आपण नववर्षाचे संकल्पही करू लागलो आहोत. अर्थात या यादीत डोळ्यांची काळजी घेण्याचा समावेश मात्र आपण केलेला नाही. नव्या वर्षाचा संकल्प करताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी ५ गोष्टी निश्चित करणे आवश्यक आहे.

वयाशी निगडित मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) व डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. मॅक्युलामधील पेशींच्या हानीमुळे एएमडी हा विकार होतो आणि त्याचा केंद्रीय दृष्टीवर परिणाम होतो.

ही समस्या वयस्कर लोकांमध्ये अधिक आढळत असली, तरी कमी वयातही ही समस्या सुरू झाल्याचे आढळले आहेत. यामागे अनुवांशिकतेसह अन्य अनेक घटक असतात. भारतातील एकूण मधुमेहींपैकी सुमारे १७.६ टक्के ते २८.९ टक्के मधुमेहींना डायबेटिक रेटिनोपॅथी अर्थात डीआरचा त्रास आहे.

डीआर ही अनियंत्रित मधुमेहाची परिणती आहे. यामध्ये नेत्रपडद्यातील (रेटिना) रक्तवाहिन्यांना हानी होते. यात पुढे मॅक्युलामध्ये द्रवपदार्थांची गळतीही होऊ शकते. याला डायबेटिक मॅक्युलर एडीमा असे म्हणतात.

दर ३ मधुमेहींपैकी एकाला डीएमई होऊ शकतो. या आजारांची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ठळकपणे जाणवत नसल्यामुळे नियमित तपासणी अत्यंत महत्त्वाची ठरते. यामुळे नेत्रविकारांचे लवकर निदान होते व वेळेत उपचार मिळू शकतात किंवा ते पूर्णपणे टाळणेही शक्य होते.

Eye Care
Eye Care : स्क्रीनसमोर काम करत असाल तर डोळ्यांचे हे व्यायाम करा

मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्‍हणाले, "आमच्‍याकडे दरमहिन्‍याला जवळपास ३५ टक्‍के रेटिनल आजारांनी पीडित रूग्‍ण येतात. ज्‍यामुळे डोळ्याच्‍या आजारांची लक्षणे व चिन्‍हे वेळेवर ओळखणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

तुम्‍हाला अंधुक दिसत असेल किंवा दृष्‍टीविषयक विकृती असेल तर त्‍वरित स्‍पेशालिस्‍टला भेटा. इंट्राविट्रिअल इंजेक्‍शन्‍स व लेझरसह डायबेटिक रेटिनोपॅथीचा वेळेवर उपचार केल्‍याने रूग्‍णांच्‍या जीवनातील उत्‍पादनक्षम काळामध्‍ये दृष्‍टी जतन करण्‍यास व सुधारण्‍यास मदत होऊ शकते.

या वृद्ध रूग्‍णांमध्‍ये मासिक इंट्राविट्रिअल इंजेक्‍शन्‍सह वेट मॅक्‍युलर डिजनरेशनचा योग्‍य उपचार करणे आवश्‍यक आहे, ज्‍यामुळे त्‍यांना वाचन करणे आणि विविध स्क्रिन्‍स पाहण्‍यासोबत जीवनाचा आनंद घेता येऊ शकतो.

म्‍हणून या आजारांच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी लवकर निदान व उपचार महत्त्वाचे आहे आणि रूग्‍णांनी सतत त्‍यांच्‍या डॉक्‍टरांशी सल्‍लामसलत करण्‍यासोबत नियमित डोळ्यांची तपासणी केली पाहिजे.’’

Eye Care
Eye care : स्क्रीन टाइम वाढल्याने दृष्टीशी संबंधित आजार होऊ शकतात का ?

निरोगी दृष्टीसाठी ५ नववर्ष संकल्प

तुमची दृष्टी निकोप राखण्यासाठी येथे ५ जीवनशैलीविषयक सूचना दिल्या आहेत :

• धूम्रपान टाळा

धूम्रपान शरीरातील विविध इंद्रियांचे गंभीर नुकसान करू शकते. सिगरेट ओढण्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणेची प्रचंड हानी होते आणि एरवी टाळता येण्याजोग्या एएमडी किंवा डोळ्याच्या अन्य विकाराला धूम्रपान करणारे सहज बळी पडतात.

सिगरेटच्या धुरात आढळणारे काही विशिष्ट ऑक्सिडण्ट्स पेशींमध्ये चुरचुर (इरिटेशन) निर्माण होते आणि त्यामुळे रोगप्रतिकार यंत्रणा सक्रिय होते. याचा परिणाम म्हणून शरीरात हानीकारक दाह निर्माण होतो.

• स्क्रीन टाइम कमी करा

फोन्स व कम्प्युटर्सचा अतिरिक्त वापर केल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर स्क्रीनचा नीलप्रकाश (ब्ल्यू लाइट) पडत राहतो आणि त्यामुळे डोळे कोरडे पडण्यापासून व थकवा येण्यापासून ते मायोपिया व एएमडीसारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या डोळ्यांतील आर्द्रता कायम राखा व स्क्रीन टाइम कमी करा.

• आरोग्यपूर्ण अन्न घ्या

शरीराचे काम योग्य रितीने सुरू ठेवणारी महत्त्वाची पोषके मिळवायची असतील तर आरोग्यपूर्ण आहार अत्यावश्यक आहे. फास्ट फूड व कॅण्डीजऐवजी आहारात भाज्या व फळांचा समावेश करा. मासे, अंडी, दुधाचे पदार्थ, संत्री, केळी, गाजर यांमधून अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

• डोळ्यांची नियमित तपासणी

नेत्रतज्ज्ञाला नियमित भेट दिल्यामुळे मोठ्या आजारांवर उपचार करणे तर शक्य होतेच, शिवाय डोळ्यांचा कोरडेपणा किंवा लाली येणे यांसारख्या छोट्या पण दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्याही हाताळणे सोपे होते. डोळ्यांच्या स्थितीबद्दल आपण जागरूक राहतो आणि नेत्रआरोग्याचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो.

• २०-२०-२० नियम : आपण फारसा व्यायाम न करता दिवसभर स्क्रीनकडे डोळे लावून बसतो. थोडा व्यायाम केल्यामुळे स्क्रीनकडे बघण्यातून ब्रेक घेता येईल आणि डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहील. स्क्रीनकडे बघताना २० मिनिटे झाली की एक ब्रेक घ्या आणि पुढील २० सेकंदे सुमारे २० फुटांवर असलेल्या एखाद्या वस्तूकडे बघा. एवढा सोपा व्यायाम आहे!

दृष्टी उत्तम राखण्यासाठी आणि नेत्रविकार किंवा पुढील हानी टाळण्यासाठी २०२३ या वर्षात या निरोगी सवयी नक्की लावून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.