नवीन वर्षात प्रत्येकजण आरोग्य, नोकरी, व्यायाम, योगा, जेवणावर नियंत्रण असे काही ना काही संकल्प करीत असतो. मात्र, ज्या प्रमाणे इतर गोष्टींचा आपण संकल्प करतो त्याचप्रमाणे लैंगिक जीवनातील आंनदासाठीदेखील एखादा संकल्प करणे महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनात (Refreshing) लैंगिक संबंधाला जिवंत ठेवण्यासाठीदेखील रिफ्रेशिंगची गरज असते. यासाठी काहीवेळा बदल करावे लागतात. ज्यामुळे लैंगिक जीवन सुखी होण्यास मदत होते. ट्रेसी कॉक्स यांनी डेली मेलमध्ये याबाबत लेख लिहिला आहे. लेखिका सेक्स आणि रिलेशनशिप तज्ज्ञ आहेत. (5 new year resolution for couples)
बेडरूम बाहेर करा संभोग
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, मात्र असे असले तरी, तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर बेडरूमबाहेर (Refreshing) सेक्स करण्यास प्राधान्य द्या. यासाठी तुम्ही घरातील स्पेअर रूम किंवा सोफ्याची निवड करण्याला प्राधान्य देऊ शकता. याशिवाय तुम्ही जोडीदाराबरोबर एकत्र शॉवरदेखील घेऊ शकता. तसेच तुम्ही नेहमीच्या पोझिशनला कंटाळला असाल तर, घरातील वेगवेगळ्या ठिकाणांवर देखील शरीर सुखाचा आनंद घेऊ शकता.
बदल करत राहा
शारीरिक सुखाचा आनंद नेहमी मिळविण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत नेहमी करीत असलेल्या गोष्टींमध्ये वेळोवेळी बदल करत रहा. यामुळे लैगिंग सुख मिळण्यास मदत होईल. समजा, तुम्ही जोडीदाराबरोबर (couples life) सकाळी शारीरिक संबंध (Physical contact) ठेवत असाल तर, यामध्ये बदल करून तो रात्रीच्यावेळी करण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही रात्री हे कार्य करत असाल, तर ते कधीतरी सकाळच्यावेळात करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय संभोगावेगळी तुम्ही संपूर्ण कपडे काढत असला तर, कधी तरी यामध्ये बदल करून अंगावर काही कपडे ठेवून संभोग करण्याचा प्रयत्न करा. शरीर सुखावेळी एखादे छानसे संगीत लावल्यास आनंद द्विगुणित होण्यास नक्कीच मदत होईल.
शरीराबद्दल अभिमान बाळगा
तुम्हाला तुमच्या शरीराची लाज वाटत असेल आणि तुम्हाला ते कुरूप वाटत असेल, तर तुम्हाला कोणी ते पाहावे किंवा स्पर्श करावा असे का वाटावे? म्हणूनच आपल्या शरीराबद्दल नेहमी अभिमान बाळगा. असे केल्याने लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणे, सेक्सचा आनंद घेण्याची अधिक इच्छा होण्यास मदत मिळण्याबरोबरच जोडीदारासोबत तुम्ही अधिक जवळीक निर्माण करू शकाल.
अधिक वेळ द्या
जोडीदाराबरोबर नियमितपणे संभोग केल्याने अनेक आरोग्य तसेच भावनिक फायदे आहेत. यामुळे तुमचे हृदय, त्वचा आणि रक्ताभिसरण अधिक चांगले राहण्यास मदत होते. तसेच मूड सुधारण्याबरोबरच नैराश्य कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हालादेखील या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर, तुम्ही करत असलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ संभोग करण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही, आठवड्यातून दोनदा संभोग करत असाल तर, पुढच्या महिन्यात पाच वेळा करण्याचा निश्चय करा. यामुळे लैंगिक आनंद मिळण्यास मदत होईल. (5 new year resolution for couples)
जोडीदाराशी मनमोकळं बोला
अनेक जोडपी लैंगिक संबंधाबद्दल जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलणे टाळतात किंवा घाबरतात. मात्र, यामुळे गैरसमज होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जोडीदाराबरोबर संभोग केल्यानंतर त्याला कितपत आनंद मिळाला आहे याबद्दल अगदी मनमोकळेपणाने विचारा, यामुळे तुम्ही अधिक जवळ येण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही कशा पद्धतीने संबंध ठेवावे याबद्दलदेखील जोडीदाराशी बोलू (Physical contact) शकता. तुम्हाला जर वेगळ्याप्रकारे संबंध ठेवायचे असतील तर, संभोगापूर्वी जोडीदाराला त्याची कल्पना द्या यामुळे गैरसमज होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.