ब्रेकअपमुळे राहू नका उदास; जाणून घ्या सिंगल राहण्याचे फायदे

ब्रेकअपनंतर सिंगल राहण्याचे 'हे' आहेत फायदे
breakup
breakup
Updated on

'ब्रेकअप (breakup) के बाद', हे मराठी गाणं तुम्ही ऐकलं आहे का? अनेक मराठी तरुण-तरुणींनी ब्रेकअप झाल्यानंतर एकदा तरी हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. ब्रेकअपनंतर आयुष्यात कसे बदल होतात हे उत्तमरित्या या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर आजकाल ब्रेकअप किंवा पॅचअप होणं ही गोष्ट तरुणाईसाठी नवीन राहिलेली नाही. परंतु, ज्यांचा पहिल्यांदाच ब्रेकअप होत असतो त्यांच्यासाठी हा फेज अत्यंत त्रासदायक असतो. त्यामुळे या काळात नकळतपणे सँडसॉन्ग्स ऐकणं, एकटं राहणं, कोणाशीही न बोलणं किंवा काही काही वेळा नैराश्य येणं अशाही घटना घडतात. पण, या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करत ब्रेकअपचे सकारात्मक फायदे कोणते माहित आहेत का? नसतील माहित तर आज आपण ब्रेकअपचे फायदे कोणते ते पाहुयात. (5-reasons-why-staying-single-after-a-hard-breakup-helps)

१. आत्मविश्वास वाढतो -

ब्रेकअप झाल्यानंतर काही काळ आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. पण, त्यानंतर तुम्ही पुन्हा नव्या आत्मविश्वासासोबत उभे राहता. कारण, या काळात तुम्ही मानसिक किंवा भावनिक आधाराच्या शोधात असता. त्यावेळी जर हा आधार मिळाला नाही. तर, सहाजिकच तुमच्यात नवा आत्मविश्वास जागा होतो.

breakup
सिनिअरबरोबर पटत नसेल तर 'या' ७ गोष्टी नक्की करुन पाहा

२. पुन्हा नव्याने स्वत:ला भेटता-

रिलेशनमध्ये आल्यानंतर अनेकदा आपण आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडीनुसार वागत असतो. त्यामुळे अनेकदा आपल्या आवडीनिवडीला छेद द्यावा लागतो. परंतु, ब्रेकअप झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वत:ला नव्याने गवसण्याची संधी मिळते. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणेवागू लागता.

३. कामात लक्ष लागतं -

कामात लक्ष न लागण्याची दोन कारणं आहेत. पहिलं प्रेमात असल्यावर, दुसरं ब्रेकअप झाल्यावर. प्रेमात असताना तुमचं लक्ष सतत पार्टनरकडे असतं. ऑफिसमध्ये असतानाही तुम्ही सतत मेसेज, कॉलवर पार्टनरसोबत बोलत असता. त्यामुळे सहाजिकच कामाकडे दुर्लक्ष होतं. पण ब्रेकअप झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात त्रास होतो. कामात लक्ष लागत नाही. परंतु, त्यानंतर तुम्ही नव्या जिद्दीने, उमेदीने उभे राहता. त्यामुळे कामावर जास्त फोकस होतो. पूर्वी अवांतर वाया जाणारा वेळ ऑफिसच्या कामात लागतो. सहाजिकच त्यामुळे कामात प्रगती होते.

४. विचार क्लिअर होतात -

प्रेमात एकदा अपयश आल्यानंतर प्रत्येकाचे आयुष्याकडे पाहण्याचे विचार बदलले असतात. एकदा केलेली चूक पुन्हा करायची नाही याकडे कायम लक्ष जातं. त्यामुळे भविष्यात नवा पार्टनर निवडताना तुमचे विचार क्लिअर झालेले असतात.

५. स्वत:चं महत्त्व जाणवू लागतं-

स्वत:च महत्त्व जाणणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा प्रेमात असल्यावर आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. पार्टनर सांगेल त्याप्रमाणे वागतो. त्याच्या सोयीनुसार, भेटीगाठी घडतात. परंतु, ब्रेकअप झाल्यावर तुम्हाला तुमचं महत्त्व कळेल. इतर सांगतील त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या तालावर नाचत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.