Marriage Life Dark Secrets: लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली खूप नाजुक फेज असते, यानंतर आपलं आयुष्य खूप बदलतं. आपल्या आयुष्यात आपल्यावरती अर्धा हक्क गाजवणारा, नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि कायमचा सखा बनणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येतो.
अनेकदा सिरियल आणि चित्रपटात ऐकतो तसं लग्न हा काही लुटुपुटूचा खेळ नाही एक वेगळा आणि व्यवस्थित समजून उमजून केला तर खूप रोमांचक आणि सुंदर अनुभव आहे.
या बंधनात अडकल्यानंतर आयुष्यातील प्रत्येक गोष्ट बदलते आणि गंमतीची गोष्ट म्हणजे त्यावर आपला स्वतःचा असा काही ताबा नसतो.
लग्नासाठी कोणी कितीही तयार असले तरी त्याच्यासोबत येणारी आव्हाने त्या व्यक्तीला नेहमीच आश्चर्यचकित करतात शिवाय याची जरा धास्ती देखील वाटते. काही घटना तुम्हाला आनंद देतात, तर काही तुमच्या संयम आणि विवेकाला आव्हान देऊ शकतात.
लग्नानंतर होणारे बदल हे अशा स्वरुपाचे असतात की विवाहित लोकांची त्याबाबत वेगवेगळी मते असतात. काहीजण लग्नाला आणि त्यानंतरच्या आयुष्याला खूप सोपे म्हणतात, तर काहीजण एका प्रकारची बेडी म्हणतात.
यावरुन एक तरी नक्कीच कळते की लग्न आपल्या स्वत:च्या अनुभवावरून वेगळं ठरतं. गरजेचं नाही आपल्या समोरच्या कपल्सच्या आयुष्यात जी आव्हानं आली ती तुम्हालाही येईल. इथे तुम्हाला अशाच काही बदलांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला कळेल की वैवाहिक जीवन तुमच्यासाठी किती आनंदी ठरु शकते.
1. इच्छा नसतानाही जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणे
तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वैवाहिक जीवन सुरु करताना तुमचं प्रत्येक डार्क सीक्रेट त्याला सांगावे लागते. आनंदी राहण्यासाठी फक्त प्रेमाची गरज आहे हे सांगणे सोपे आहे. पण त्याबरोबर लागतो तो विश्वास. नात्यात विश्वास असेल तरच गोष्टी सुरळीत चालतात. त्यामुळे प्रत्येक निर्णय आपल्या पार्टनरशी बोलूनच घ्यावा लागतो.
2. आर्थिक दृष्ट्या रोखटोक येऊ शकते.
तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे कबूल आहे पण फक्त प्रेम तुमच्या ताटात अन्न किंवा डोक्यावर छप्पर देऊ शकत नाही. हे काम फक्त पैसाच करु शकतो.
त्यामुळे लग्नानंतर, तुम्ही हातातले पैसे पाण्यासारखे खर्च करु शकत नाही, कारण तुमचे कुटुंब सुरु करण्यासाठी मोठे घर घेणे, कदाचित कार खरेदी करणे आवश्यक आहे.
तुमच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसे लागतील. म्हणूनच असे म्हटले जाते की लग्न हे सर्वात निष्काळजी व्यक्तीला देखील त्याच्या आयुष्यात पैशाचे महत्त्व शिकवते.
3. स्वतःसाठी वेळ काढणे अवघड आहे
तसं लग्न खूप भारी असतं. दोघांचाच असा संसार असे वाटते आणि नव्याची नवलाई म्हणत लग्नाचे सुरुवातीचे दिवस आनंदाने भरलेले असतात. अगदी तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत प्रत्येक मिनिट घालवायला आवडेल. पण काही दिवसांनीच तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडे स्वतःसाठी असा काही वेळच उरला नाही.
4. कुटुंबाशी जुळवून घ्याव लागतं
अगदी मुलाच असो वा मुलीचं दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाशी जुळवाव लागतच. पटो वा न पटो आदर मात्र करावा लागतो. लग्नानंतर माणसासाठी सर्व नाती नवीन असतात म्हणूनच असे म्हणतात की लग्नानंतर नातेसंबंधांचे व्यवस्थापन जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
नाहीतर संबंध बिघडू लागतात. लग्नानंतर तुमचे कुटुंब तुम्हाला लहानपणापासून ओळखते हे लक्षात घेऊन तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारण प्रत्येक चुकीच्या निर्णयासाठी तुमच्या पार्टनरला जबाबदार धरले जाऊ शकते.
एवढं सगळं असलं तरी जर एकमेकांमध्ये समजूतदारपणा असेल तर काही अडचण नाही. तुम्ही एकमेकांशी सगळं शेयर केलं, समजून घेतलं तरी ह्या अडचणींमधून मात करु शकतात. एक सुंदर नातं तेव्हाच निर्माण होतं जेव्हा त्यात विश्वास असतो. त्यामुळे एकमेकांना वेळ द्या आणि समजून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.