शिक्षण, नोकरी, लग्न अशा विविध कारणांमुळे आता मुलं आईवडिलांपासून लांबच्या शहरात राहू लागली आहेत. मुलं लांब गेल्यावर पहिल्यांदा पालकांना (Parents) भिती वाटते. ती कशी राहत असतील? नीट जेवण (Food) मिळते का? व्यसन तर नाही लागणार? अशा अनेक चिंता सतावतात. मुलं पहिल्यांदा पालकांना रोज फोन करतात. पण नंतर अभ्यास, कॉलेज, मित्र-मैत्रिणी यात रमून जातात. काही मुलं (Children) तर जिथे जातात तिकडची होऊन जातात. अशावेळी त्यांना पालकांना फोन करायला वेळ मिळतोच असं नाही. काही पालक मग स्वत:हुन फोन करून ख्यालीखुशाली विचारतात. आपल्यापासून दूर असलेल्या मुलांबरोबर संवाद सुरू ठेवायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
१) मुले त्यांच्या दोन्ही पालकांशी घट्ट संबंध ठेवतात. पण जेव्हा लांब असतात तेव्हा असे बंध राखणे कठीण असू शकते. पण, पालकांनी ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. यासाठी पालक आणि मुलांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. मुलांनी पालकांना दैनंदिन तपशीलांची माहिती देणे. पण यात जर कोरडेपणा असेल तर कदाचित गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे संवाद कसा साधावा हे सुद्धा महत्वाचे ठरेल. अशावेळी मुलं जर कनफ्युज असतील तर या परिस्थितीत पालकांनी शांत राहून त्यांना धीर देणे गरजेचे आहे.
२) योग्य नियोजन असावे- लांब राहणाऱ्या मुलांसाठी पालकांनी काहीतरी नियोजन केलेल असते. तसेच मुलांना प्रवास करताना पालकांनी शेड्युलिंग, खर्च करण्याची योजना करमे गरजेचे वाटते. पालकांनी जेव्हा योग्य असेल तेव्हा त्यांच्या मुलांच्या विकसित होत असलेल्या गरजांशी जुळवून घेत आहे.
३) सातत्य महत्वाचे - लांब राहूनही पालकांना मुलांविषयी काही अपेक्षा असतात. तसे मुलांनी वागल्यास बंध जुळवून घेण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या ठरतात. नियमितपणे शेड्यूल केलेले फोन कॉल किंवा व्हिडिओ चॅट यामुळे पालकांशी त्यांचा नियमित संपर्क राहू शकतो. मुले आणि पालकांना एकमेकांशी कधी संपर्क साधता येईल हे आधीच कळल्यास ताण कमी होऊ शकतो.
४) मुलांना मदत करण्यासाठी सक्रीय असा- पालकांना त्यांच्या मुलांना लांब-अंतराच्या पालकत्वासाठी मदत करण्यासाठी पर्याय शोधण्याची गरज नाही. इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत. आणखी एक कल्पना यात तुम्ही करू शकता. ‘काउंटडाउन जार’ ही कल्पना, ही पद्धत एका आईने तिच्या मुलासोबत वापरली. तुम्ही एकमेकांना किती दिवसांनी भेटणार आहात ते दिवस म्हणजे संख्या दर्शवण्यासाठी रोज एक नाणं घेऊन तो जारमध्ये भरा. तुम्ही त्याला पाहेपर्यंत त्याने अनपेक्षित अशा खूप चांगल्या गोष्टी केलेल्या असून शकतात. ती प्रगती तुम्हाला जसे भेटाल तशी पाहता येईल. शिवाय त्या जारचाही वेगळ्या पद्धतीने कसा उपयोग करायचा हे ठरवता येईल.
५) सर्जनशील व्हा- लांब अंतराच्या पालक आणि मुलांमध्ये नियमितपणे संपर्क असला तरीही, अधूनमधून उत्स्फूर्ततेने काही गोष्टी करता येऊ शकतात. आनंद घेण्यासाठी व्हिडिओ मॅसेज पाठवणे.मुलांनी पालकांना किंवा पालकांनी मुलांना भेट पाठवणे. पालकांनी अशा मुलांना आनंद देणाऱ्या गोष्टी केल्यास तो आनंद मुलांच्या मनात कायम राहील. तुमचे नातेसंबंध यामुळे अधिक गहिरे होऊ शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.