5.2 Fasting Diet : मधुमेह अन् पोटाचा वाढलेला फुगा कमी करतो 5.2 चा फॉर्म्युला, संशोधकांनी अभ्यासानंतर केला दावा

Healthy Diet For Weight Loss And Diabetes :जर एखाद्या मधुमेही रुग्णाने 5.2 चा फॉर्मुला वापरला तर त्याला मधुमेहापासून सुटका मिळू शकते.
5.2 Fasting Diet
5.2 Fasting Dietesakal
Updated on

5.2 Fasting Diet :

जगभरात मधुमेह हा अतिशय झपाट्याने वाढणारा आजार बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका सर्वेनुसार भविष्यात जगातील निम्म्याहून अधिक लोक मधुमेहाला बळी पडणार आहेत. याचे कारण आहे आपल्या खाण्याच्या सवयी.

मधुमेह हा असा आजार आहे की ज्यामध्ये इन्सुलिन सारखे डोस सतत घ्यावे लागतात. पण आता एका नव्या रिसर्चमध्ये असे सांगण्यात आले आहे की जर एखाद्या मधुमेही रुग्णाने 5.2 चा फॉर्मुला वापरला तर त्याला मधुमेहापासून सुटका मिळू शकते. (Healthy Diet For Weight Loss And Diabetes)

5.2 Fasting Diet
Fasting Rules: उपवासाच्या वेळी हे तीन पदार्थ खाणे टाळा!

काय आहे हा 5.2 फॉर्मुला

5.2 हा फॉर्म्युला एक डायटचा प्रकार आहे. ज्यामध्ये आठवड्यातील पाच दिवस तुम्ही डायट संबंधित फूड खायचे आणि दोन दिवस उपवास करायचा. या पद्धतीचा वापर करून अनेक लोकांनी वजनही कमी केले आणि डायबिटीज सारखा गंभीर आजारही दूर पळवला.

हा डायट प्रकार नवीनच आहे. त्यामुळे फारसे लोकांना त्याबद्दल माहिती नाही. पण ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक आणि राजकीय नेते जॉर्ज ओसबोर्ने, हॉलीवुड स्टार क्रिस प्रैट, जेनिफर एनिस्टन आणि कर्टनी करदाशिया हे सुद्धा हा डायट फॉलो करतात.

5.2 Fasting Diet
Apple Scary Fast Event : अ‍ॅपलने लाँच केले नवीन MacBook Pro आणि iMac; काय आहेत अपग्रेडेड फीचर्स?

बीजिंग हॉस्पिटल मधील नवीन सर्वेनुसार ज्या लोकांना मधुमेह आहे. त्यांना 5.2 प्लॅन फॉलो करायला सांगितला होता. जेव्हापासून ते लोक फॉलो करत आहेत तेव्हापासून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाली आहे.

या डायटमुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी आणि वजनही कमी झाले आहे. या अभ्यासात 400 लोकांना समावेश केला होता. त्यांचे तीन ग्रुप मध्ये विभाजन करण्यात आले होते. पहिल्या समूहातील रूग्णांना मधुमेहावरील औषध मेटाफॉर्मिन देण्यात आले.

5.2 Fasting Diet
Intermittent Fasting : इंटरमिटेंट फास्टिंग आणि फायदे...

आणि दुसऱ्या ग्रुपला इंपेगलिफ्लोजिन देण्यात आले. तर तिसऱ्या ग्रुपला 5.2 या डायटचे पालन करण्यात सांगण्यात आ.ले हे लोक पाच दिवसांपर्यंत हेल्दी डायट करत होते. आणि दोन दिवस उपवास करत होते या प्रयोगाचे जे रिझल्ट आले तेव्हा सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.

ज्या लोकांनी 5.2 चे चे पालन केले त्यांच्यात रक्तातील साखरेची पातळी कमी झाली. आणि या लोकांचे वजन 9.7 किलो इतके कमी झाले. संशोधकांच्या असे म्हणणे आहे की 5.2 डायट प्लॅन मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी एक चांगला बदल आहे. आणि जर कोणी अँटिबायोटिक औषधे खात असेल तर त्यावरही हा हा डायट प्लॅन प्रभावी काम करू शकतो.

5.2 Fasting Diet
Teachers Fasting : २० टक्के वेतानासाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

आजकाल इंटरमिटेड उपवास केले जात आहे. पाश्चिमात्य लोक याचे जास्त पालन करतात. भारतात अनेक वर्षांपासून उपवास करण्याचे परंपरा आहे. पण त्याचा फारसा फायदा होत नाही कारण आपण उपवासाला अधिकच खातो.

पण जर आठवड्यातील पाच दिवस आपण हेल्दी डायट फॉलो करून दोन दिवस उपवास केला. तर वाढलेलं वजन आणि रक्तात असलेली ग्लुकोजची पातळी कमी करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.