Divorced Women Want To Bond In New Relationship : कित्येकदा असे दिसून येते, की महिला घटस्फोटानंतर स्वत:ला सावरू शकत नाही. त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्ग असतात पण त्या इतक्या भावनिक झालेल्या असतात की त्यांना आयुष्यातत पुढे जाण्यासाठी स्वत:ला समजावू शकत नाही आणि खूश राहू शकत नाही. पण आता काळ बदलला आहे. एका डेटिंग अॅपच्या सर्वेनुसार, यंदा बऱ्याच घटस्फोटीत महिलांना आपल्या आयुष्यातील एकटेपणा दुर करू इच्छित आहेत. (55 percent of divorced women want to forget everything and Get married again)
लग्न हे असे नातं असते जिथे प्रेम आणि विश्वास असतो. दोन्ही जोडीदारांपैकी एकानेही प्रेम आणि विश्वासाला धक्का पोहचविल्यास नातं तुटू शकते. अशा वेळी लग्नाचं नातं अशा वळणावर येऊन पोहचतं जिथे घटस्फोट घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळेच कधीच लग्नाचा निर्णय अचानक घेत नाही. कारण योग्य निर्णय तुमच्या आयुष्यात जसा आनंद निर्माण करू शकतो तसाच तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचे आयुष्यात दु:खही निर्माण करू शकतो. डेटिंग अॅप (Dating App) Quack-Quack नुसार, यंदा बऱ्याचदा घटस्फोटीत महिला आपल्या आयुष्यातील एकटेपणा दुर करू इच्छित आहेत.
या अॅपच्या सर्वेनसार, 55 टक्के घटस्फोटीत महिलांचे मत आहे की, त्यांना आधी घडलेल सर्व काही विसरुव नवीन नात तयार करायचे आहे. पण. अशाही काही महिला आहेत त्यांना आयुष्यात जोडीदाराची गरज नाही त्यांना आयुष्यभर एकट राहायचे आहे. कपल आणि फॅमिली सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, विवाहबाह्य संबध, एकमेकांशी न पटणे, दारू किंवा व्यसन करण्याची सवय, कम्युनिकेशन गॅप हे घटस्फोटसाठी कारणीभूत ठरतात.
मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जुन्या नात्यांसाठी रडत बसण्यापेक्षा नवीन नात्याची सुरूवात करणे चांगले असते. हे घटस्फोटनंतर आलेले नैराश्य आणि ताण यातून बाहेर येण्यासाठी मदत करते. पुन्हा लग्न आयुष्यात सकारात्मकता घेऊन येते, जगणे सोपे बनवते. महिला भावनिकदृष्टया स्टाँग होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.