सिनिअरबरोबर पटत नसेल तर 'या' ७ गोष्टी नक्की करुन पाहा

बॉसचा राग येतोय? पंगा घेताय पण जरा जपून, नाहीतर...
सिनिअरबरोबर पटत नसेल तर 'या' ७ गोष्टी नक्की करुन पाहा
Updated on

कोणत्याही ऑफिसमध्ये जा बॉस आणि कर्मचारी यांचं फारस पटत नसल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा मनात इच्छा नसतानाही बॉस सांगेल ते काम करावं लागतं. अनेकदा यातून वादाची ठिणगीही उडते. त्यामुळे एकदा का बॉसच्या मनात आपल्याविषयी राग निर्माण झाला. तर, आपल्या नोकरीवर गदा येईल की काय? अशी भीती सतत कर्मचाऱ्यांना सतावते. परंतु, यात असेही काही कर्मचारी असतात जे न घाबरता थेट बॉससोबत भिडतात आणि त्यांच्यासोबत शाब्दिक वाद घालतात. परंतु, बॉससोबत वाद घालण्यापेक्षा त्यांच्याशी मैत्रीचं नातं तयार केलं. तर तुमची समस्या नक्कीच दूर होईल.(7-things-never-say-to-your-boss)

१. उर्मटासारखं बोलू नका -

ऑफिसमध्ये प्रत्येक जण आपल्या सहकाऱ्यांसोबत मज्जा-मस्ती करत काम करत असतो. यात अनेकदा बॉसदेखील सहभागी होतात. यात अनेकदा काही जण मज्जेमध्ये बॉसकडे पगाराचा विषय काढतात. व, इतक्या पगारात इतकंच काम शक्य आहे असं सांगतात. परंतु, त्यामुळे बॉसला राग येऊ शकतो. किंवा, तुम्ही अनप्रोफेशनल आहात असा त्यांचा समज होऊ शकतो. त्यामुळेच बॉससोबत पगाराविषयी बोलायचं असेल तर त्यांची वेळ मागून मग चर्चा करा.

सिनिअरबरोबर पटत नसेल तर 'या' ७ गोष्टी नक्की करुन पाहा
हेल्थ ट्रॅक करण्यासाठी घ्या 'हे' फिटनेस बँड

२. तुमच्या अडचणी बॉसला सांगा -

ऑफिसमध्ये असे अनेक सहकारी असतात ज्यांचं एकमेकांसोबत फारसं पटत नाही. अनेक लहान मोठ्या कारणांवरुन त्यांच्यात वाद होतात.त्यातच जर या दोन्ही सहकाऱ्यांना एकाच प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं तर मग झालंच कल्याण. त्यामुळे काम करताना वाद होत असतील तर बॉससोबत संवाद साधा. काम करताना नेमकी कोणती अडचण येते हे त्याच्या कानावर घाला. नाही तर, बॉसच्या नकळतपणे तुम्ही काही प्लॅन करत असाल तर त्यामुळे बॉस रागावण्याची शक्यता जास्त आहे.

३. चूक स्वीकारा-

एखाद्या कामात चूक झाली तर सहाजिकच बॉस साऱ्यांनाच धारेवर धरतो. यात अनेकदा आपली चूकही नसते. परंतु, तरीदेखील आपल्याला बॉसचा ओरडा खावाच लागतो. पण, यावेळी बॉसला प्रत्युत्तर देण्यापेक्षा सॉरी म्हणा आणि विषय तिथेच मिटवा.

सिनिअरबरोबर पटत नसेल तर 'या' ७ गोष्टी नक्की करुन पाहा
वडिलांवर प्रेम करता ना?; या दिवसामागील खास कारण माहितीये का?

४. नवीन आव्हानं स्वीकारा -

काही जणांच्या कोणत्याही कामाची सुरुवात नाही या शब्दापासूनच होते. हे शक्य नाही, हे कसं काय शक्य होणार असंच त्याचं पहिलं मत असतं. यात बॉसने तुम्हाला एखादं काम दिलं तर ते निमूटपणे करण्याचा प्रयत्न करा. जर बॉस समोरच तुम्ही नाही जमणार किंवा हे शक्य नाही असं सांगितलं तर बॉस चिडू शकतो.

५. नकारात्मक वातावरण निर्माण करु नका -

ज्यावेळी कंपनीमध्ये नवीन बॉस येतो त्यावेळी तो त्याच्या काही नव्या आयडिया किंवा कल्पना घेऊन येत असतो. त्यामुळे त्याचं म्हणणं प्रथम सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. यात अनेकदा बॉसने काही कल्पना सांगितली की, याचा काही उपयोग नाही. हे आम्ही आधी ट्राय केलंय, असं सांगितलं तर सहाजिकच बॉसला त्याचा राग येऊ शकतो. त्याच्या आत्मविश्वास आणि आत्मसन्मानाला ठेच पोहोचू शकते. त्यामुळे बॉस जे सांगेल ते ऐका, पुन्हा नव्याने ते काम करण्याचा प्रयत्न करा.

६. काम टाळू नका -

ऑफिसच्या कामाचा ताण कोणावर नसतो? प्रत्येकालाच टेन्शन असतं. त्यातच बॉसने तुम्हाला नवीन काम दिलं तर चिडचिड करु नका. त्यामुळे तुमचं निगेटिव्ह इंप्रेशन पडू शकतं. तसंच माझ्याकडे श्वास घ्यायला पण वेळ नाही. मला सध्या हे काम शक्य नाही, असं जर तुम्ही म्हणालात तर बॉसला त्याचा राग येऊ शकतो.

७. बॉसला नियम शिकवू नका-

प्रत्येक नव्या बॉसचे काही नवीन नियम असतात. त्यामुळे त्यांने सांगितलेले नियम तुम्हाला फॉलो करावे लागतात. पण, आम्ही हे असं करत नाही. आमची ही पद्धत आहे असं जर तुम्ही बॉसला सांगितलं. तर तो चिडू शकतो. त्यामुळे तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि नवीन गोष्टींचा स्वीकार करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.