सध्याच्या काळात घटस्फोट घेणे ही सामान्य बाब झाली आहे. अनेक लोकं एकमेकांचा स्वभाव, मतं पटली नाहीत, खूप भांडणं झाले, अफेअर्स, करिअरला महत्व अशा विविध कारणांनी घटस्फोट घेतात. अनेकदा घटस्फोटाचं (Divorce) दु:ख खूप तीव्र असतं. त्यातून बाहेर पडणं अनेकांना कठीण जातं. पुन्हा नव्याने सुरूवात करणे अनेकांना कठीण जाते. पण किती काळ एकटं राहायचं? का राहायचं या भावनेने अनेकजण पुनर्विवाहासाठी (Remarraige) तयार होतात.
पण घटस्फोटानंतर तुमच्या स्वभावात, दृष्टीकोनात बदल झालेला असतो. स्त्रियांमध्ये असे बदल प्रकर्षाने दिसतात. अशावेळी पुन्हा लग्न करण्यासाठी डेटींग (Dating) करणे हे जास्त आव्हानात्मक असते. पण आता काळ बदलल्याने अनेक स्त्रिया पुन्हा नव्याने प्रेम शोधण्यासाठी तयार आहेत. क्वॅकक्वॅक(QuackQuack) या डेटिंग अॅपने महिला वापरकर्त्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार, घटस्फोट झाल्याने स्त्रियांना आपला आनंद परत मिळवणे गैर वाटत नाही. उलट त्या डेटींग करून समोरच्या व्यक्तीला तपासून घेणे जास्त पसंत करतात, असे दिसून आले आहे.
१) सर्वेक्षणात शहर व उपनगरातील ६७ टक्के स्त्रिया पुन्हा प्रेम मिळविण्यासाठी तयार होत्या. घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच त्यांनी डेटिंग करायला सुरूवात केली. ३३ टक्के वापरकर्ते डेटिंगच्या कल्पनेबद्दल सावध होते. पण त्यांनी डेटींग करणे बंद केलेले नाही, असे यात आढळून आले,
२) ३० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ७२ टक्के युझर्सनी घटस्फोटानंतर डेटिंग करण्याला पसंती दिली. त्यांच्यापैकी केवळ २८ टक्के महिलांना भूतकाळातील गोष्टी पुसून टाकत नवीन नातेसंबध निर्माण करण्याची भिती वाटत होती. तर ६५ टक्के महिला लॉंग टर्मसाठी प्रियकराच्या शोधात होत्या. उर्वरित ३५ टक्के महिलांना लग्न करून पुन्हा आयुष्यात सेटल व्हायचे होते.
३) २५ ते ३५ वयोगटातील सिंगल मदर्सना बॉयफ्रेंडऐवजी नवरा हवा होता.
४) ६७ टक्के युझर्सनी ऑफलाइन डेटिंगपेक्षा सुरक्षित पर्याय असल्याने ऑनलाइन डेटिंगला प्राधान्य दिले. यामुळे त्यांना गोष्टी नीट समजून, समोरच्या व्यक्तीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यात तसेच समोरची व्यक्ती १०० टक्के कमिटेड आहे कि नाही हे ठरविण्यात मदत झाली.
५) तर, दुसरीकडे ३३ टक्के युझर्सनी समोरच्याला भेटण्यासाठी पारंपारिक पद्धत निवडली. ते समोरच्या व्यक्तीला मित्र किंवा सहकाऱ्याने ओळख करून दिल्याने भेटले.
६) तर, ७५ टक्के वापरकर्त्यांचा घटस्फोटामुळे तुमचा दृष्टीकोन बदलतो, असा विश्वास आहे. तसेच तुमची विचारसरणी बदलते. तुम्ही फुलपाखराच्या मागे न धावता ज्याच्याकडून विश्वास आणि खंर प्रेम, संवाद मिळेल अशा गोष्टी बघून समोरच्याशी बोलता असे वाटते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.