८ तास झोपणे महत्वाचे नाही! झोपेची गुणवत्ता ठरते महत्वाची| Study

सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी याविषयी अभ्यास केला
sleep
sleepesakal
Updated on

८ तासांची झोप मिळणे शरीरासाठी आवश्यक असते. हे आपण याआधी अनेकदा ऐकलंय. कारण इतकी झोप घेतल्यास शरीरावर त्याचे अनेक फायदे होतात. पण एखाद्या व्यक्तीच्या अनुवांशिकतेवर त्याने किती झोपावे हे अवलंबून असते असे संशोधकांचे म्हणणे आहे. जेव्हा झोप येते तेव्हा किती तास झोपता यापेक्षा तेव्हा तिच्या गुणवत्तेला जास्त महत्व असते. नैसर्गिकरित्या झोप कमी असलेले लोकं (People with Familial Natural Short Sleep (FNSS) फक्त चार ते सहा तास झोपणे पसंत करतात. तरीही त्यांच्यात कार्यक्षमता चांगली असते.

sleep
दुपारी ऑफिसमध्ये येणारी झोप कशी टाळाल? जाणून घ्या सोप्या टिप्स

सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधील संशोधकांच्या मते, हे एलिट स्लीपर" मानसिक लवचिकता आणि न्यूरोडिजेनेरेटिव्ह परिस्थितींना प्रतिकार करतात. त्यामुळे ते न्यूरोलॉजिकल रोगापासून बचाव करण्याचा मार्ग शोधू शकतात. याचा अर्थ त्यांचा मेंदू झोप कमी वेळेत आणि गूणवर्तापूर्ण परिस्थितीत पूर्ण करतो.

sleep
झोपेतून उठल्यानंतर तुम्हालाही थकवा जाणवतो? Sundar Pichai यांनी सांगितला कानमंत्र

याविषयी यूसीएसएफ वेइल इन्स्टिट्यूट फॉर न्यूरोसायन्सेसचे यिंग-हुई फू म्हणाले की, झोपण्यात कमी वेळ दिल्याने त्यांच्या कार्यक्षमतेत परिणाम होत नाही. संशोधक म्हणतात की, अनेक कुटूंबांमध्ये हे आढळते. त्यांनी जीनोममध्ये पाच जीन्स ओळखले आहेत. जे कार्यक्षम झोप घेण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. न्यूरोलॉजिस्ट लुई पॅटासेक म्हणाले की, प्रत्येकाला आठ तासांची झोप हवी असते. पण अनुवांशिकतेच्या आधारे झोपेची किती आवश्यकता आहे ते वेगवेगळे असते. जर्नल iScience ने याविषयी अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी उंदराचा वापर केला. लोकांच्या झोपेमध्ये सुधारणा केल्याने रोगाचा विकास होण्यास वेळ लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले. लुई पॅटासेक म्हणतात की, तुम्हाला झोप लागण्यासाठी तसेच झोपेतून जागे होण्यासाठी मेंदूचे अनेक भाग एकत्र काम करतात. निरोगी लोकांची झोप सुधारल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होता. तसेच प्रत्येकाच्या वेळेची गुणवत्ता सुधारू शकते, संशोधकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.