AC Servicing: एसी सर्व्हिसिंग अन् रिपेअरिंगच्या नावाखाली होतोय स्कॅम, जाणून घ्या कसा कराल बचाव

AC Serving: अनेकवेळा एसी सर्व्हिसिंगच्या नावाखाली अनेक मेकॅनिक गरज नसतानाही पार्ट बदलून किंवा जूने पार्ट लावून ग्राहकांकडून पैसे वसून करत असतात.
AC Servicing:
AC Servicing:Sakal
Updated on

AC Servicing: देशात अनेक ठिकाणी पाऊस तर अनेक ठिकाणी अजूनही उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. यामुळे जशजशी गरमी वाढत आहे तसतशी एसीची मागणीही वाढत आहे. एसीची मागणी जितकी वाढत आहे, तितकी एसीच्या नावाखाली होणारी लूटही वाढत आहे. एसीला प्रत्येक हंगामात १ते २ वेळा सर्व्हिसिंग करावी लागते. अन्यथा ते थंड हवा देत नाही. आजकाल एसीच्या दुरूस्तीच्या नावाखाली अनेकांची लूट होत आहे हे टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

एसी दुरुस्तीच्या नावाखाली होतोय स्कॅम

सध्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी सर्व्हिसिंग आणि रिपेअरिंगच्या नावाखाली अनेक मेकॅनिक लोकांकडून पैशाची लूट करत आहेत. सर्व्हिसिंग करताना लक्ष न दिल्यास तुमची फसवणूकही होऊ शकते.

मेकॅनिक काहीवेळा लक्षात न घेता कंडेन्सर बदलतात, ज्यामुळे एसीची कार्यक्षमता कमी होते आणि लोकांना पुन्हा मेकॅनिकला बोलावावे लागते. मेकॅनिक पुन्हा येतात आणि त्याच वापरकर्त्याचे कंडेन्सर त्याच्या एसीमध्ये बसवतात आणि त्याच्याकडून जास्त पैसे घेतात. एसी सर्व्हिसिंगच्या वेळी फसवणूक करण्याची ही पद्धत सामान्य आहे. आणखी काही पद्धती आहेत ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

AC Servicing:
Car Care Tips : आता कारमध्ये वाटेल गार-गार; AC मध्ये करा एवढाच बदल, मायलेजसुद्धा वाढेल

अनावश्यक भाग बदलणे

मेकॅनिक तुम्हाला सांगू शकतात की तुमच्या एसीचा हा भाग खराब आहे आणि तो बदलणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा खर्च खूप वाढू शकतो.

बनावट जुने पार्ट लावणे

काही वेळा सर्व्हिसिंग दरम्यान अस्सल भागांच्या जागी जुने किंवा बनावट भाग वापरू शकतात, ज्यामुळे एअर कंडिशनरचे आयुष्य कमी होऊ शकते.

अतिरिक्त शुल्क आकारणे

सर्व्हिसिंग दरम्यान किंवा दुरुस्तीदरम्यान रासायनिक धुणे किंवा अतिरिक्त गॅस रिफिलिंग यांसारखे अतिरिक्त शुल्क आकारून एकूण बिल वाढवले ​​जाऊ शकते.

फेक सर्व्हिस प्रोव्हायडर

काही फसवे लोक ज्यांना एसीबद्दल फारशी माहिती नाही, ते एसी उघडतात आणि खराब सर्व्हिस करतात आणि पैसे घेऊन जातात.

एसी सर्व्हिसिंगमध्ये होणारे स्कॅम कसे ओळखावे?

जर तुम्हाला तुमचे पैसे खर्च होऊ द्यायचे नसेल आणि एसी खराब होण्यापासून वाचवायचे असेल, तर सर्टिफायइड सर्विस प्रोवाइडरकडून काम करून घ्यावे.

याशिवाय, तुम्ही कंपनीच्या प्रमाणित सर्विस प्रदात्याकडूनही सेवा घेऊ शकता. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

सर्विस बुक करताना, काय चूक होऊ शकते याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा आणि संभाव्य खर्चाचा तपशील देखील विचारा.

सर्विस दरम्यान, AC जवळ रहा आणि मेकॅनिक काय करत आहे याकडे लक्ष द्या.

सर्विसनंतर, कोणतेही अनावश्यक खर्च जोडलेले नाहीत याची खात्री करण्यासाठी बिल नीट तपासा.

तुमच्या एसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पार्ट्सची किंमत आणि सेवा शुल्क तपासण्याची खात्री करा.

गॅस रिफिलिंगची आवश्यकता असल्यास, गॅसची पातळी तपासल्याशिवाय गॅस रिफिल करू नका कारण हा सर्वात सामान्य घोटाळा आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.