Acne problem: खरचं चेहऱ्यावर लिंबू लावण्याने पुरळांची समस्या कमी होत का?

चेहऱ्यावर मुरुम असेल तर फक्त त्यामुळे डागच पडत नाहीत, तर त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूजही दिसून येते.
Acne problem
Acne problemEsakal
Updated on

आपल्या चेहऱ्यावर जर का प्रचंड मुरुम आले, असतील तर ते मुरुम निघून जावे, यासाठी बरेच लोक वेगवेगळे उपाय आपल्याला सांगतात आणि आपणही त्यांनी सांगितलेले उपाय फॉलो करू लागतो.

पण तुम्हाला माहिती का की असे उपाय खरचं लाभदायक आहेत की नाही. कारण उदाहरणार्थ, लिंबू लावल्याने पिंपल्स बरे होतात किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पिंपल्स होतात. या सर्व गोष्टी खऱ्या आहे की खोट्या याविषयीची सखोल माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत. आजकाल त्वचेच्या अनेक समस्या आहेत, ज्याचा तरुण मुली मुलांना सामना करावा लागतो. चेहऱ्यावर मुरुम असेल तर फक्त त्यामुळे डागच पडत नाहीत, तर त्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा आणि सूजही दिसून येते.

काही लोकांचे मुरुम खूप वेदनादायक असतात, अशा परिस्थितीत प्रत्येकजण त्वरीत या मुरुमापासून सुटका करू इच्छितो. चेहऱ्यावर मुरुम येण्यामागे अनेक कारणे असतात, ज्यात तेलकट त्वचा किंवा तेलकट पदार्थ खाणे इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व एक समज आहे, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. काही लोकांना असे वाटते की ब्लॅकहेड्स दाबल्याने मुरुमांची समस्या दूर होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यावर आपण पूर्णपणे जाणून घेण्याआधीच विश्वास ठेवू लागतो. त्याच वेळी, या गोष्टींचे पालन करण्यात समस्या आहे आणि समस्या वाढण्याची भिती वाटु लागते.

चला तर मग जाणून घेऊ या पिंपलशी संबंधित या मिथकांविषयी सत्य..

Acne problem
अरारारा, मॉडेलला सर्जरीची हौस नडली, चेह-याचं केलं मातेरं

तेलकट पदार्थ खाल्याने मुरुमांची समस्या निर्माण होते का?

तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुम होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हे खरे नाही. वास्तविक, बटाटे, साखर, मैदा आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे ग्लायसेमिक इंडेक्समध्ये मुरुम वाढतात.

● अॅसिडीटीमुळे मुरुम होतात का?

अॅसिडीटीमुळे मुरुमे होतात असा अनेकांचा समज आहे. पण पोटातील आतडे साफ करणे संसर्गाशी संबंधित असू शकते, त्याचा मुरुमांशी काहीही संबंध नाही. याविषयी बहुतांश आहारतज्ज्ञांचे मत वेगळे असले तरी याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.

Acne problem
चेह-यावरील चरबी कमी करण्यासाठी जाणून घ्या 5 व्यायाम प्रकार

● सतत स्क्रब केल्यामुळे मुरूम होतात.

काही मुली किंवा स्त्रिया पुरळ आल्यावर पुन्हा-पुन्हा स्क्रब करायला लागतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. जास्त प्रमाणात एक्सफोलिएशन केल्याने त्वचा चरचर होऊ शकते किंवा मुरुमांची समस्या वाढू शकते. त्यामुळे पुरळ आल्यावर सतत स्क्रब करु नका.

● चेहऱ्यावरचे मुरुम घरच्या घरी फोडल्यामुळे देखील चेहरा खराब होतो.

घरच्या घरी ब्लॅकहेड्स काढल्याने मुरुमांपासून लवकर सुटका मिळू शकते. हा आपला गोड गैरसमज आहे.

हे लक्षात ठेवा की झिट्सवर पॉपिंग किंवा दाबल्याने फक्त जास्त संसर्ग, जळजळ किंवा हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते.


● लिंबू चेहऱ्यावर लावणे टाळावे कारण...

चेहऱ्यावरील मुरुम बरे होण्यासाठी बहुतेक जण लिंबू लावतात, परंतु तज्ञांच्या मते त्वचेवर लिंबू लावणे चुकीचे आहे. त्यांच्या मते, लिंबू किंवा त्याचा रस थेट लावल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे पिंपल्सची समस्या अधिक वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.