Madhuri Dixit : वयाची 56 वर्षे उलटली पण तारुण्य बघाल तर...माधुरीचं ब्युटी सीक्रेट काय माहितीये?

तिच्या वाढदिवशी आपण माधुरीचं ब्युटी सीक्रेट जाणून घेऊयात
Madhuri Dixit
Madhuri Dixitesakal
Updated on

Madhuri Dixit : धक धक गर्ल म्हणून बॉलीवूडमध्ये आजही जिच्या तारुण्याचा जलवा दिसून येतो अशी चाहत्यांची आवडती माधुरी दीक्षित हिचा आज ५६ वा वाढदिवस. मात्र तिच्या तारुण्याकडे बघता या आकड्यावर सहसा कोणाचा विश्वासच बसत नाही. तिचं ब्युटी सीक्रेट काय आहे असा प्रश्न अनेक तरुणींना पडतो. आज तिच्या वाढदिवशी आपण माधुरीचं ब्युटी सीक्रेट जाणून घेऊयात.

त्वचेची उत्तम निगा राखली गेली तर वय हा केवळ आकडा उरतो. तुम्ही कुठल्याही वयात अगदी माधुरीसारखे तरुण दिसून शकता.

काय आहे माधुरीचं ब्युटी सीक्रेट?

माधुरी दिवसातून दोनदा फेसवॉश करते. तसेच चेहऱ्यासाठी टोनर,SPF, सीरम वापरते. आणि झोपण्यापूर्वी ती नाइट क्रीम लावते. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ती आणखी एक जुनी पद्धत वापरते. ती चेहऱ्याला मध लावते. मधामुळे चेहऱ्यासंबंधीच्या सगळ्या समस्येतून सुटका मिळेल.

Madhuri Dixit
Madhuri Dixit : बाबो, 48 कोटींच्या घरात राहाते माधुरी, बघा तिचं घर

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ती भरपूर पाणी पिते

माधुरीने एका मुलाखतीत सांगितले होते की ती तिची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि प्रफुल्लित दिसण्यासाठी भरपूर पाणी पिते. पाणी तुमच्या शरीराला मॉइश्चरायझेशन देते आणि टवटवीत ठेवते, तसेच तुमच्या त्वचेची लवचिकता राखते. जे लोक भरपूर पाणी पितात त्यांच्यात चट्टे, सुरकुत्या यांचे प्रमाण कमी असते. (Beauty)

Madhuri Dixit
Madhuri Dixit : धकधक गर्लचं मधाळ सौंदर्य...

नियमित वर्कआउट्स त्वचेची निगा राखण्यास मदत करते

निरोगी डाएट आणि स्किनकेअर रूटीन पाळणे सर्वोत्तम आहे, परंतु व्यायामाचे रूटीन पाळणे तितकेच महत्वाचे आहे. माधुरी आठवड्यातून दोनदा जिममध्ये जाते, तर ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून तीनदा कथ्थक करते. तुम्ही तुमच्यासाठी अनुकूल आणि तुम्हाला आवडेल असा नित्यक्रम देखील समाविष्ट करू शकता. (Birthday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.