High Carb Foods : निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे, हे फार महत्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये सर्व घटकांचा समावेश असणे, गरजेचे आहे. ज्यामध्ये, जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, कॅल्शिअम, प्रोटिन्स इत्यादी घटकांचा समावेश असायलाच हवा. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला कर्बोदकांची ही गरज असते.
परंतु, आजकाल अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात त्यांच्या डाएट प्लॅनमधून हाय कार्ब्स फूड (कर्बोदके) पूर्णपणे काढून टाकतात. खरं तर हे पूर्णपणे चुकीच आहे. कर्बोदकांचे सेवन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
त्यामुळे, कर्बोदकांचा आहारात समावेश असणे, फार गरजेचे आहे. आज आपण हाय कार्ब्स फूड्स बद्दल अर्थात उच्च कर्बोदकांचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.
ओट्स हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि आरोग्यदायी मानले जातात. त्यामुळे, अनेकांच्या आहारात या ओट्सचा समावेश आढळून येतो. ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आणि फायबर्सचा समावेश असतो. ज्यामुळे, आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर ओट्सचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते.
कॉर्न ज्याला मका म्हणून ही ओळखले जाते. या कॉर्नला कर्बोदके आणि फायबर्सचा प्रमुख स्त्रोत मानले जाते. वजन कमी करण्यासाठी कॉर्न अतिशय फायदेशीर आहेत. या कॉर्नचे सेवन केल्याने बराच काळ पोट भरलेले राहते. फायबरयुक्त मक्याचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे, हृदयरोगांचा धोका कमी होतो.
केळ्यांमध्ये देखील उच्च कर्बोदकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. कर्बोदकांचा उत्तम स्त्रोत म्हणून केळ्यांना खास करून ओळखले जाते. त्यामुळे, अनेकांच्या आहारात केळीचा समावेश असतो. पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी-६ आणि व्हिटॅमिन सी देखील केळीमध्ये आढळून येते.
जे वजन कमी करण्यासाठी आणि रक्तपरिसंचारणाची प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे, तुमच्या आहारात या उच्च कर्बोदकांनीयुक्त असलेल्या केळ्यांचा जरूर समावेश करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.