Adivasi Hair Oil: अनेक लोकांना लांब आणि घनदाट केस हवे असतात. केसांची वाढ होण्यासाठी बाजारात सुद्धा अनेक प्रकारचे शॅम्पू, कंडीशनर मिळतात. सध्या सोशल मिडियावर केस वाढवण्यासाठी आदिवासी तेल चांगले व्हायरल होत आहे. हे तेल कर्नाटकमधील आदिवासी क्षेत्रात तयार होते असे सांगण्यात येत आहे. तसेच या तेलाची जाहिरात अनेक सेलिब्रेटी देखील करत आहेत. यामध्ये कॉमेडियन भारती सिंग, कोरियोग्राफर फराह खान, यु-ट्युबर एल्विश यादव यासारख्या अनेक नावांचा समावेश आहे.
या तेलाची जाहिरात पाहिल्यानंतर या तेलाची चर्चा जास्त वाढली आहे. ज्या महिला आणि पुरूषांचे केस आधीच लांब आणि घनदाट आहे अशा लोकांकडून या तेलाची जाहिरात केली जाते. पण असा दावा केला जात आहे की हे तेल वापरल्यास केसांची वाढ होते आणि टक्कल असलेल्या लोकांना देखील केस येतात.
पण हे तेल किती फायदेशीर आहे आणि यामध्ये कोणत्या औषधी वनस्पती वापरल्या जातात आणि हे तेल कसे बनवले जाते हे जाणून घेणे गरजेचे आहे.