ग्लूटेन-फ्री डाएट म्हणजे काय? जाणून घ्या, या डाएटविषयी

ग्लूटेन-फ्री डाएटमध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश
ग्लूटेन-फ्री डाएट म्हणजे काय? जाणून घ्या, या डाएटविषयी
Updated on

गेल्या काही वर्षांमध्ये फिटनेस फ्रिक लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक जण त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे फिट राहण्यासाठी लोक बऱ्याचदा वेगवेगळे डाएट फॉलो करत असल्याचं दिसून येतं. यामध्येच सध्या ग्लूटेन-फ्री डाएट हा नवा डाएट प्रकार ट्रेंड होऊ लागला आहे. म्हणूनच, हे ग्लूटेन-फ्री डाएट म्हणजे काय ते फिटनेस आणि न्युट्रिशन एक्सपर्ट रोहित शेलाटकर यांनी सांगितलं आहे. (advantages-disadvantages-of-going-gluten-free)

अमेरिकेमध्ये सध्याच्या घडीला जवळपास ३१ लाख लोकांनी ग्लूटेन-फ्री डाएट फॉलो करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भारतातही हा डाएट प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे.

ग्लूटेन म्हणजे काय?

ग्लूटेन एक प्रकारचं प्रोटीन असून गहू आणि बार्ली सारख्या धान्यांमध्ये ते आढळून येतं. या ग्लूटेनमुळे शरीरात अन्न एकत्र राहण्यास मदत मिळते. परंतु, ग्लूटेनचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास पचनसंस्थेशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.

ग्लूटेन-फ्री डाएट म्हणजे काय? जाणून घ्या, या डाएटविषयी
तोच तोपणा सोडा! आता स्वयंपाक घराला द्या 'हे' हटके रंग

ग्लूटेन-फ्री डाएटमध्ये खा 'हे' पदार्थ

मासे,मटण, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, फळे, ग्लूटेन-फ्री पालेभाज्या, तांदूळ,मका,बाजरी,अक्रोड, रताळं,ओट्स

स्टार्च-

बटाटे, मक्याचं पीठ, डाळीचं पीठ,सोया पीठ

ग्लूटेन-फ्री डाएट म्हणजे काय? जाणून घ्या, या डाएटविषयी
वाचनाची आवड असेल तर 'या' पद्धतीने सजवा रिडिंग कॉर्नर

ग्लूटेन-फ्री डाएटचे फायदे -

१. पचनक्रिया सुरळीत होते -

ग्लूटेन असलेल्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे पचनक्रिया काही अंशी मंदावली जाते. परंतु, ग्लूटेन फ्री डाएट सुरु केल्यावर पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. परिणामी, अन्नपचन नीट झाल्यामुळे वजनदेखील नियंत्रणात राहतं.

२. सूज कमी होते -

शरीरावरील एखाद्या भागावर सूज आली असेल तर ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्याचे टाळावेत. ग्लूटेन-फ्री डाएट केल्यामुळे शरीरावरील सूज लवकर कमी होते. खासकरुन डेअरी प्रोडक्ट्स ग्लूटेन फ्री असतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करता येऊ शकतो. तसंच तुम्ही ग्लूटेन फ्री डाएट फॉलो करत असाल तर आहारात दही, पनीर,क्रीम, तूप या पदार्थांचा समावेश करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()