Adventure Travel Tips : प्रत्येकजण कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठेतरी जाण्यासाठी ट्रिप करत असतो. सुट्ट्यांमुळे टूरवर जाण्याचा प्लॅन सर्वात खास बनत चालला आहे. मात्र, असे अनेक लोक आहेत ज्यांना एकटे फिरायला आवडते. त्यांना सोलो ट्रॅव्हलर्स म्हणतात.
सोलो ट्रॅव्हलिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा अनुभव असतो. ज्या लोकांना जगापासून दूर जात स्वतःला थोडा वेळ द्यायचा असतो ते लोक मोठ्या प्रमाणात सोलो ट्रॅव्हल करतात. पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे एकट्यानं पावसाळ्यात फिरण्यासाठी धबधबे आणि धरणांच्या काठी गर्दी असते.
पावसात भिजत हिरव्यागार डोंगरातून, घाटातून एकट्यानं प्रवास करण्याचा प्लॅन हा नक्कीच चांगला आहे. कारण त्यात कोणाचं टेन्शन नसतं. कोणाची जबाबदारी नसते.
बहुतेक सोलो ट्रॅव्हलर्सना सायकल टूरप्लॅन करायला आवडते. या साहसी सहली आहेत तसेच पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत. जर तुम्हीही सायकलने टूर प्लॅन करत असाल तर जाणून घेऊया त्यासंबंधित काही टिप्स
सायकलची देखभाल
सायकलने प्रवास करण्याचे सर्व प्लॅनिंग झाले आहे, पण जर तुम्हाला त्याची बेसिक माहिती नसेल तर तुम्ही कुठेही अडकू शकता. त्यामुळे सायकलच्या देखभालीविषयी प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट समजून घ्या, कारण प्रवासात असे अनेक प्रसंग येऊ शकतात जेव्हा सायकलच्या देखभालीची गरज भासू शकते.
आरसे आणि हँडल
जर तुम्ही सायकलने लांब पल्ल्याच्या प्रवासाला जात असाल तर त्यात रियर मिरर आणि फोनहँडल ठेवा. फोन हँडल आपल्याला ऑनलाइन नकाशे पाहण्यास मदत करतात.
हेडफोन आणि इयरफोन टाळा
सायकल चालवताना नेहमी सतर्क राहण्याचा प्रयत्न करा. हेडफोन आणि इयरफोन वापरणे टाळा. कारण यामुळे तुमचे लक्ष हिरावून घेतले जाऊ शकते आणि अपघातहोण्याचा धोका असतो.
विश्रांती घेऊन प्रवास पूर्ण करा
प्रवासाला जाताना सतत सायकल चालवणं टाळा. साकीलिंग करताना थांबून मध्येच विश्रांती घ्या आणि मग पुढे जा. यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि प्रवास मजेशीर होईल. अजून एक गोष्ट, सूर्यास्तानंतर कधीही सायकल चालवू नका.
आवश्यक वस्तू सोबत ठेवा
सायकल सहलीला जात असाल तर आवश्यक वस्तू सोबत ठेवा. खाद्यपदार्थ, टॉर्च, छत्री, हेल्मेट ठेवायला विसरू नका. त्याचबरोबर सायकलिंग करताना हायड्रेशनची काळजी घ्या.
हवामान बघून बाहेर पडा
सायकलने सहलीला जाताना हवामानाची काळजी घ्या. हवामानाची योग्य माहिती ठेवल्यास कुठे जायचे, कसे जायचे याबाबत योग्य निर्णय घेता येणार आहे. यामुळे अनेक समस्या टाळता येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.