१२ वर्षांत ४० शस्त्रक्रिया केल्यानंतर आता तिला पुन्हा पूर्वीसारखं दिसायचंय

शरीर पूर्ववत करण्यासाठी तिने १ लाख २० हजार रुपये खर्च केले.
jeniffer pamplona
jeniffer pamplonaesakal
Updated on

मुंबई : Kim Kardashian या कलाकाराप्रमाणे आपले बाह्य व्यक्तिमत्त्व तयार करण्याच्या मोहापायी मॉडेल जेनिफर पाम्प्लोना हिने ६ लाख डॉलर खर्च केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपले आधीचेच शरीर चांगले होते याचा साक्षात्कार एक दिवस तिला झाला आणि शरीर पूर्ववत करण्यासाठी तिने १ लाख २० हजार रुपये खर्च केले.

jeniffer pamplona
मलाईका अरोरा घेतेय 'विटॅमिन डी' थेरपी, काय आणि कशासाठी आहे ही थेरपी वाचा..

न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार २९ वर्षीय मॉडेलने १२ वर्षांत ४० सौंदर्य शस्त्रक्रिया करून घेतल्या आणि त्यानंतर तिला जाणीव झाली की आपली आधीची शरीरयष्टी जास्त चांगली होती. तिचं त्या कलाकाराविषयीचं आकर्षण जेमतेमच असल्याचं तिला कळलं.

jeniffer pamplona
what's appवर तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे का, हे कसे ओळखाल ?

मी स्वत: एक उद्योजिका आहे आणि माझ्या करिअरमध्ये मी खूप काही कमावले आहे; पण माझी ओळख केवळ kardashianच्या नावानेच निर्माण झाली होती. लोक मला तिच्याच नावाने ओळखतात हे दु:खद होते, असे पाम्प्लोना सांगते.

१७ वर्षांची असताना पाम्प्लोनाने पहिली शस्त्रक्रिया करून घेतली. हळूहळू तिला प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे तिला शस्त्रक्रिया करून घेण्याचे व्यसन जडले. यात नितंब रोपण आणि फॅट इंजेक्शन्स यांचाही समावेश होता. ४० पेक्षा अधिक उपचार तिने घेतले.

किमची जुळी बहीण म्हणून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. लाखो लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करू लागले. मात्र एवढे असूनही पाम्प्लोनाचा आनंद हिरावला गेला होता. तिला या सगळ्याचा मानसिक ताण येऊ लागला होता.

आपले शरीर पूर्ववत करण्याचे तिने ठरवले. याचाही तिला त्रास झाला. ती सतत आजारी राहू लागली. तिच्या गालांतून तीन दिवस रक्त येत होते. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेतल्याची जाणीव तिला झाली.

या अशा गोष्टींमुळे तुम्ही इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवू शकते. पण यामुळे प्रत्यक्ष आयुष्याची वाट लागते, असा संदेश पाम्प्लोना देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()