Lip Fillers : उर्फीनंतर या अभिनेत्रीने करून घेतली लिप फिलर्सची ट्रिटमेंट, याचे फायदे अन् तोटे काय? जाणून घ्या

फिल्मी जगतात कॉस्मॅटिक्स सर्जरी फार कॉमन आहे
Lip Fillers
Lip Fillers esakal
Updated on

Lip Fillers : बॉलीवूड जगतात अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी एकापाठोपाठ एक ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. फिल्मी जगतात कॉस्मॅटिक्स सर्जरी फार कॉमन आहे. अलीकडेच अभिनेत्री उर्फीने याची कबुलीसुद्धा दिली होती की, ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तिने लिप फिलर्सची ट्रिटमेंट करून घेतली होती. मात्र असे करणारी उर्फी ही एकमेव अभिनेत्री नाहीये. आणखी बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत.

उर्फीने ट्रिटमेंट करत असल्यासंदर्भात एक पोस्टही शेअर केली होती

उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर एक जुना फोटो शेअर करत लिहीले होते की, मी १८ वर्षांची होती तेव्हापासून ही ट्रिटमेंट करतेय, मात्र तेव्हा माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. मात्र मला कायम वाटायचं माझे ओठ फार पातळ आहे, म्हणून मी जाड ओठांसाठी ही ट्रिटमेंट घेत होती. शिवाय तिने चाहत्यांना असा सल्लादेखील होता की, जर तुम्ही लिप फिलर्स करून घेत असाल तर चांगल्या डॉक्टर्सकडूनच सर्जरी करून घ्या.

जावेद जाफरीच्या मुलीनेसुद्धा केलीय ही ट्रिटमेंट

लिप फिलर्स आणि अंडरआय फिलर्स या काही कॉस्मेटिक प्रोसेस आहेत ज्याद्वारे लोक त्यांचे सौंदर्य वाढवतात. पूर्वी हा ट्रेंड फक्त चित्रपट जगत आणि फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित लोकांमध्ये लोकप्रिय होता, परंतु आजकाल सामान्य लोक देखील या ट्रिटमेंट्स मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. अलीकडेच प्रसिद्ध अभिनेते जावेद जाफरी यांची मुलगी अलाविया जाफरी हिनेही लिप फिलर्स करून घेतल्याचे सांगितले.

अलाविया जाफरी हिने तिच्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगितले की तिने 2019 मध्ये जेव्हा ती कॉलेजची विद्यार्थिनी होती तेव्हा लिप फिलर्स केले होते, ती म्हणाली, 'माझे डार्क सर्कल्स फार खोलवर गेले होते म्हणून मी ही सर्जरी केली. डार्क सर्कल्समुळे माझी स्किन फार घाण दिसत होती. माझे ओठ खूप पातळ होते आणि मला ते थोडे जाड हवे होते. मी पहिल्यांदा लिप फिलर्स जून 2019 मध्ये केले, मी कॉलेजमध्ये असताना, मी डिसेंबर 2019 मध्ये दुसरे लिप फिलर्स केले, तेव्हा मला वाटले की ते पुरेसे आहे, म्हणून काही काळ मी परत ते केले नाही. आता साधारण ६ महिन्यांपूर्वी मी अंडर आय फिलर करून घेतले.

लिप फिलर्स म्हणजे काय?

लिप फिलर्स ते लोक करतात ज्यांचे ओठ खूप पातळ आहेत, या प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे तुमचे ओठ जाड आणि आकर्षक दिसावेत. ही पद्धत कायमस्वरूपी नसते, ती पुन्हा पुन्हा करावी लागते. फिलरमध्ये सामान्यत: हायलुरोनिक ऍसिड आणि कोलेजन असते जे ओठांना गुळगुळीत करतात.

ही ट्रिटमेंट धोक्याची आहे का?

लिप फिलरद्वारे तुम्ही तुमच्या ओठांना हवा तसा आकार देऊ शकता, परंतु ही पद्धत महाग आणि वेदनादायक आहे, जी 4 ते 6 महिने टिकते. यामध्ये, एक सिरिंज वापरली जाते जी वेदनादायक असते, यात फॅट असतात जे त्यात व्यक्तीच्या शरीरातून काढले जातात. या प्रक्रियेदरम्यान वेदना कमी करण्यासाठी, प्रथम एक स्कीनचा भाग सुन्न करणारी क्रीम लावली जाते, ज्यामुळे ओठांवर सूज येऊ शकते.

Lip Fillers
Lip Care: लिपस्टीकमुळे होतयं ओठांचं नुकसान? या गोष्टींची घ्या काळजी

लिप फिलर्सचे तोटे

ओठ जाड दिसण्यासाठी अनेक स्त्रिया स्वतःचे नुकसान करून घेतात, तुम्ही विचार न करता ही प्रोसेस अजिबात करू नका. आधी डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमचे नैसर्गिक ओठ सर्वोत्कृष्ट असतात. अभिनेत्री अनेकदा लिप फिलर्स करून घेतल्यानंतर पश्चाताप करतात, कारण त्यांचा चेहरा यामुळे पूर्णपणे खराब झाला दिसत असतो. तेव्हा स्किनशी निगडित कुठलीही ट्रिटमेंट करताना आधी नक्की विचार करा. (Lifestyle)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.