Makeup Tips : आपण आपल्या आरोग्याची ज्याप्रमाणे काळजी घेतो. अगदी त्याप्रमाणे आपण त्वचेची काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे. कारण, जर आपण त्वचेची नीट काळजी घेतली नाही की, त्याचा विपरीत परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होण्याची दाट शक्यता असते.
वयाच्या चाळीशीत ज्या महिला आहेत. त्यांनी तर त्वचेची खास काळजी घेणे महत्वाचे आहे. अन्यथा मेकअप करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या टाळण्यासाठी चाळीशीतील महिलांनी त्वचेची सुरूवातीपासून नीट काळजी घेणे आवश्यक आहे.
आज आपण चाळीशीतील महिलांनी मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? त्याबद्दलच्या खास टिप्स शेअर करणार आहोत. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
चाळीशीतील महिलांनी किंवा चाळीशीच्या पुढच्या महिलांनी मेकअप करताना पावडर उत्पादनांचा वापर टाळणे महत्वाचे आहे. या पावडर उत्पादनांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या अधिक ठळक दिसू लागतात, त्यामुळे, तुमचा पूर्ण मेकअप खराब दिसण्याची शक्यता असते.
त्यामुळे, या गोष्टी टाळण्यासाठी मेकअप करताना लिक्विड प्रॉड्क्टसचा वापर करा. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग लपतील आणि चेहरा फ्लॉलेस दिसेल.
जेव्हा तुम्ही मेकअप करायला सुरूवात करता तेव्हा हा मेकअप चेहऱ्यावर लावण्यापूर्वी व्हिटॅमीन सी अंडर आय क्रीम या क्रीमचा वापर चेहऱ्यावर सर्वात आधी करा.
या क्रीमचा वापर केल्याने तुमचा चेहरा ब्राईट दिसतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या, पुरळ, काळे डाग आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे दिसत नाहीत. त्यामुळे, मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर ही क्रीम अवश्य लावा. मार्केटमध्ये ही क्रीम तुम्हाला सहज मिळेल.
वाढत्या वयामुळे तुमच्या ओठांजवळची त्वचा सैल व्हायला लागते. ही त्वचा सैल झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ही स्पष्ट दिसू लागतात. त्यामुळे, ओठांवर लीप लायनर अवश्य लावा.
शिवाय, लीप लायनरचा वापर न करता तुम्ही लिपस्टिक लावली तर ती लगेच पसरते. या उलट लीप लायनरचा ओठांवर वापर केल्याने लिपस्टिकला ते सैल त्वचेपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे, लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप लायनरचा वापर अवश्य करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.