सारिका शेट्टी
मी अनेक वर्षे ऑटोमोबाईल क्षेत्रात नोकरी करत होते. त्यामुळे मला वाहन कर्जाची पूर्ण माहिती होती. भाडेतत्त्वावर राहत असलेल्यांनादेखील सहज वाहनकर्ज मिळते. मात्र, ते गृहकर्जासाठी पात्र नसतात. मी गृहकर्जासाठी अर्ज केला, तेव्हा मी सुमारे ऐंशी हजार रुपयांहून अधिक रकमेचे घरभाडे नियमित भरत होते. मात्र, असे असताना मला त्या आधारे गृहकर्ज मिळाले नाही. तेव्हाच मला ही एक कल्पना सुचली, की आपण भाडेकरू आणि त्याची आर्थिक ओळख निर्माण करणारे कार्ड तयार करू शकतो का? आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी प्रयत्न करत होते आणि त्यातून मी ‘रेंटल पे’ची स्थापना केली.