Aging Effect : वाद संपला! रिसर्चमधून समोर आलं पुरुष अधिक वृद्ध दिसतात की स्त्रिया?

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस म्हातारी होणारचं आहे.
Aging Effect
Aging EffectSakal
Updated on

Research On Aging Effect : जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस म्हातारी होणारचं आहे. मात्र, अनेकजण वाढत्या वयाबरोबर वृद्ध दिसू नये यासाठी कसोशिने प्रयत्न करत असतात.

Aging Effect
Winter Hair Dandruff : हिवाळ्यात केसामध्ये खूप कोंडा होत असेल तर 'हे' उपाय करून बघा...

बरं, तुमच्यापैकी अनेकांनी पतीकडे एखादी महिला म्हातारपण आल्याची तक्रार करताना ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, अनेकदा महिला आणि पुरूषांमध्ये कोण लवकर म्हातारं होतं यावरून वाद होतात. काही स्त्रियांच्या मते महिलांच्या तुलनेत पुरूष स्त्रियांपेक्षा लवकर म्हातारे होतात असं म्हणणे असते. परंतु, आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून नक्की पुरूष अधिक लवकर वृद्ध दिसतात की महिला यावर उत्तर शोधण्यात आले आहे.

Aging Effect
Winter Season : थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने हार्टअ‍ॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

सर्वात आनंदी देश असलेल्या फिनलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ज्यव्स्किला येथे नुकत्याच झालेल्या एका रिसर्चचे निष्कर्ष समोर आले आहेत. यात असे आढळून आले आहे की, पुरुष जैविक दृष्ट्या महिलांपेक्षा अधिक वृद्ध असतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, व्यक्तीचे वृद्धत्वदेखील लिंगावर आधारित आहे! चला तर, मग लिंगाच्या आधारे करण्यात आलेल्या वृद्धत्वावरील या रिसर्चमधून नेमकं काय निष्कर्ष समोर आले आहेत.

50 वर्षांचे पुरुष दिसतात 54 वर्षांचे

IA संशोधनाच्या आधारे, तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की 50 वर्षांचे पुरुष जैविक दृष्ट्या (बायोलॉजिकल) स्त्रियांपेक्षा चार वर्षांनी मोठे दिसतात. यामागे पुरूषांचे अति धुम्रपान असल्याचे संशोधनात सांगण्यात आले आहे. तसेच पुरुषांच्या शरीराच्या संरचनाही यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुरुष त्यांच्या वयापेक्षा मोठे दिसतात.

Aging Effect
Road Trip In Foreign: ना फ्लाइटची गरज ना व्हिजाची कटकट; या सात देशांत कारने फिरत घ्या सहलीचा आनंद

एपिजेनेटिक घड्याळ्यांचा करण्यात आला वापर

करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी वयानुसार केलेल्या या लिंग-आधारित अभ्यासासाठी एपिजेनेटिक घड्याळांचा वापर केला. हे घड्याळ रक्ताच्या नमुन्यावरून डीएनए मेथिलेशन पातळीद्वारे एखाद्या व्यक्तीच्या जैविक वयाचा अंदाज लावू शकते. एपिजेनेटिक घड्याळं त्याच्या अल्गोरिदमिक पॉवरसह, एका विशिष्ट वयात एखाद्या व्यक्तीचे बायोलॉजिकल वय काय आहे याचा अंदाज लावू शकते.

लहान वयातच दिसून येऊ शकतो फरक

पुरुषांचे बायोलॉजिकलदृष्ट्या वय स्त्रियांपेक्षा जास्त असते. 50 वर्षांचा पुरुष त्याच वयाच्या स्त्रीपेक्षा चार बायोल़जिकल वर्षांनी मोठा असतो. हा फरक अगदी लहानपणापासूनच दिसून येतो. विशेष म्हणजे हा फरक पुरुषांमध्ये वयाच्या 20 व्या वर्षीच दिसू लागतो.

Aging Effect
Astro Tips : नामस्मरण नेमकी कोणती माळ घेऊन करावे?

जुळ्या भाऊ आणि बहिणींमध्ये आढळून आला फरक

लिंगाच्या आधारावर वयातील बायोलॉजिकल फरक समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी जुळ्या भाऊ आणि बहिणींवर काही अभ्यास केला. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातही शास्त्रज्ञांना समान फरक आढळून आला. जुळ्या भावंडांच्या बाबतीतही भाऊ बायोलॉजिकलदृष्टीने त्याच्या जुळ्या बहिणीपेक्षा एक वर्ष मोठा आढळून आला. जुळ्या मुलांची निम्मी जनुके सारखीच असतात आणि ती एकाच वातावरणात वाढलेली असतात असे कारण शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.