राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील महिला कृषी पदवीधारक, शेतकरी महिला गट आणि शेतकरी महिला यांच्यासाठी ही एक आशादायक योजना आहे.
भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, पीकरचनेत बदल घडवून आणणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे, आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
रोपवाटिका योजना ही राज्य सरकार आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२० पासून ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना’ या नावाने राबविण्यात येत आहे. योजनेला २०२४-२५ या आर्थिक वर्षातही राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. योजनेमध्ये निवड झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्या संमतीने कामास सुरवात करावी. प्रकल्प पूर्ण झाल्यावर कृषी सहाय्यक पाहणी करतील आणि त्यांच्या संमतीने ६० टक्के अनुदान खात्यात जमा होईल. उर्वरित ४० टक्के रक्कम ही प्रत्यक्ष रोपे तयार झाल्यावर संमत केली जाते.
अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.
रोपवाटिका उभारण्यास पाण्याची कायमची सोय आवश्यक.
निवडीसाठीचे प्राधान्यक्रम
महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य. महिला गट, महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य
भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य
(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.