Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीया आणि पुराणातील या गोष्टींचा आहे थेट संबंध, जाणून घ्या बरंच काही...

पुरातन काळापासून अक्षय तृतीयेच्या शुभ दिनीच नव्या युगाचा प्रारंभ झाल्याचे आढळते
Akshay Tritiya 2024
Akshay Tritiya 2024 esakal
Updated on

Akshay Tritiya 2024 : 

अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या सर्वांनाच अक्षय तृतीया म्हणजे पुरणपोळी, आमरसाचे ताट आणि सोने, वस्तू खरेदी इतकेच सुचते. पण, हा सण तेवढ्यापुरताच मर्यादीत नाहीय. कारण, अक्षय तृतीयेला साडे तीन मुहूर्तांमध्ये स्थान मिळवून देणाऱ्या काही घटना इतिहासात घडल्या आहेत.

यंदाच्या अक्षय तृतीयेला रवी योग होणार आहे.या दिवशी धन योग, गजकेसरी योग, शुक्रादीत्य योग, मालव्य योग आणि शश राजयोग बनत आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा करणे फल प्राप्ती करून देणारे ठरते. (Akshay Tritiya 2024)

Akshay Tritiya 2024
Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अशी करा माता लक्ष्मीची पूजा, घरातील आर्थिक संकटे दूर होतील

आज आपण अक्षय तृतीया का साजरी केली जाते. त्याचे पौराणिक महत्त्व आणि इतिहासातील घटना याबद्दल जाणून घेऊयात.

अक्षय तृतीया का साजरी केली जाते?

युगांचा प्रारंभ

अक्षय तृतीयेला इतर मुहूर्तांपेक्षा अधिक महत्त्व आहे. त्यावर आधारित अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यात उल्लेख केलेल्या कथांनुसार, पुरातन काळापासून अक्षय तृतीयेच्या शुभ दिनीच नव्या युगाचा प्रारंभ झाल्याचे आढळते.

Akshay Tritiya 2024
Akshay Kumar: "त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्..."; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव

श्री विष्णूंचा सहावा अवतार 

अक्षय तृतीयेदिवशीच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचा जन्म झाला होता. त्यादिवशीच भगवान परशुरामांचा जन्मोत्सवही साजरा केला जातो.

महाभारत आणि अक्षय तृतीया

एका पौराणिक कथेनुसार, अक्षय तृतीयेदिवशीच सत्य युग म्हणजे स्वर्ण युगाची सुरुवात झाली होती. तर, याच दिवशी भगवान गणेशांनी वेद व्यास सांगतील तसे महाभारत लिखाणाला सुरूवात केली होती.

Akshay Tritiya 2024
Akshay Kumar: 'अरे बाबा तो टॉम क्रुझ आहे, त्याच्या एका स्टंटमध्ये आपल्या...' काय बोलून गेला अक्षय कुमार?

अक्षय तृतीयेलाच भेटले सुदामा आणि श्री कृष्ण

भगवान श्री कृष्णांचं बालपण गोकुळात गेलं आहे. तेव्हा त्यांचे अनेक मित्र होते. एकदा सुदामा आपल्या मित्र श्री कृष्णांना भेटायला आला. तेव्हा श्री कृष्ण मथुरेच्या सिंहासनावर बसले होते. तेव्हा द्वारपालांनी सुदामाला महालात जाण्यापासून रोखलं.

आपला मित्र सुदामा आला आहे, हे कळताच श्री कृष्ण धावत द्वाराजवळ गेले आणि त्याला भेटले. तेव्हा सुदामाने आणलेले पोहे श्री कृष्णांनी खाल्ले आणि मित्राने न सांगताच त्याचे दारिद्यही श्रीकृष्णांनी दूर केले. हाच तो अक्षय तृतीयेचा दिवस होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.