Akshay Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अशी करा माता लक्ष्मीची पूजा, घरातील आर्थिक संकटे दूर होतील

या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा
Akshay Tritiya 2024
Akshay Tritiya 2024esakal
Updated on

Akshay Tritiya 2024 :

अक्षय तृतीया हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी चांगला मानला जातो. ग्रामिण भाषेत या सणाला आकिती म्हणूनही ओळखतात.

या दिवशी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर देव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे.

दोनच दिवसांनी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. यावेळी अक्षय्य तृतीया खूप खास असणार आहे, कारण यावेळी अक्षय्य तृतीया शुक्रवारी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी देवीची उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते.

या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा केली तर तुम्हाला हवे असलेले फळ प्राप्त होईल. तर आज आपण माता लक्ष्मीची अक्षय तृतीया दिवशी पूजा कशी करावी हे आपण जाणून घेऊयात.

देवी लक्ष्मीच्या पूजेसाठीचा मुहूर्त

पहाटे 5 वाजून 13 मिनिटांपासून सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपर्यंत तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करू शकता.

Akshay Tritiya 2024
Akshay Kumar: "मी असा ब्रेकअप्समधून सावरलो'',अक्षयने केला खुलासा

पूजेची मांडणी कशी करावी?

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे

  • त्यानंतर पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करावी

  • एका पाटावर लाल किंवा पिवळे कापड अंथरावे

  • त्यावर माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती आणि कुबेर देवांचा फोटो मांडावा

  • फोटोंना स्वच्छ पुसून घ्या, हळद, कुंकू चंदनाचा टिळा लावावा

  • फोटोला हार घालावे आणि समोर अक्षता, दुर्वा, पान-सुपारी ठेवावी

  • माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती आणि कुबेर यांना वंदन करावे

  • त्यानंतर माता लक्ष्मीचा जप, कनकधारा स्तोत्र, श्री विष्णू नामावली,कुबेर चालीसा म्हणावी.

  • देवांजवळ अगरबत्ती, धूप लावावे

  • देवीला बत्ताशे, खीर, मखाणे, लाह्यांचा नैवेद्य दाखवावा.

  • हा प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहन करावा

Akshay Tritiya 2024
Akshay Kumar New Movie: साऊथच्या 'सूर्या'च्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक घेऊन येतोय 'अक्षय कुमार', रिलीज डेटही केली जाहीर

माता लक्ष्मीचा मंत्र

ऊँ महालक्ष्म्यै नमो नमः । ऊँ विष्णुप्रियायै नमो नमः ।।

ऊँ धनप्रदायै नमो नमः । ऊँ विश्वजन्नयै नमो नमः ।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.