Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

भारतातील महिलांचीच नव्हे तर पुरूषांचीही सर्वात आवडती गुंतवणूक पद्धत म्हणजे सोने खरेदी
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 esakal
Updated on

Akshaya Tritiya 2024 :

हिंदू धर्मात असे अनेक मुहूर्त आहेत ज्या दिवशी शुभ कामे केली जातात. सोने,नाणे यांसारख्या वस्तूंची खरेदी केली जाते. या मुहूर्तावर वास्तूशांतही पार पडते. यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी होत आहे.

अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही. म्हणूनच असे मानले जाते की, या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. यासोबतच अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. (Akshaya Tritiya 2024)

Akshaya Tritiya 2024
Akshay Trutiya : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

अक्षय तृतीयेला लोक भरपूर सोने खरेदी करतात. पण अनेक वेळा लोक न तपासता बनावट किंवा कमी कॅरेटचे सोने घरी आणतात. खरे तर अनेकांना सोने कसे तपासले जाते हे माहीत नसते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याने तुम्ही खरेदी केलेले सोने खरे आहे की भेसळयुक्त हे ओळखता येईल.

भारतीयांचा सोन्यावर जास्त जीव

भारतातील महिलांचीच नव्हे तर पुरूषांचीही सर्वात आवडती गुंतवणूक पद्धत म्हणजे सोने खरेदी. सोने हे संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि पिढ्यानपिढ्या सोन्याचे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केले गेले आहे.

आजकाल अनेक रिल्सस्टार गळ्यात किलोभराच्या सोन्याच्या चैन घालतात. तर, महिलाही पारंपरिक दागिन्यांसह नव्या डिझाईन्स सोन्यात बनवून घेत आहेत. अक्षय्य तृतीया, दिवाळी पाडवा, गुढी पाडवा या मुहूर्तावर सोन्याची मोठी खरेदी होते.

Akshaya Tritiya 2024
Akshay Kumar: "त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्..."; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव

प्रत्येकजण सोने खरेदी करत असताना, सोन्याचा दर्जा, त्याचे कॅरेट कसे तपासायचे इत्यादींविषयी अचूक माहिती असणारे फार कमी लोक आहेत. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते, जी kt किंवा k ने दर्शविली जाते.

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे आणि त्यात 99.9 टक्के सोने आहे. परंतु ते खूपच मऊ असते त्यामुळे दागिने बनवण्यासाठी इतर धातू मिसळले जातात.

18k सोन्यामध्ये 18 भाग सोने आणि 6 भाग इतर धातू असतात. म्हणजे दागिन्यांमध्ये 75 टक्के शुद्ध सोने असते.अशा परिस्थितीत इतर धातूंची जास्त भेसळ झाली तर सोने प्युअर राहत नाही. तेच कसे ओळखायचे हे पाहुयात.

Akshaya Tritiya 2024
Akshay Kumar: 'अरे बाबा तो टॉम क्रुझ आहे, त्याच्या एका स्टंटमध्ये आपल्या...' काय बोलून गेला अक्षय कुमार?

व्हिनेगर वापरा

सोन्याच्या तुकड्यावर व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि वाट पहा. सोन्याचा रंग बदलला तर समजून घ्या की सोने अशुद्ध आहे. जर सोने जसे आहे तसे राहिले तर सोने शुद्ध आहे.

ऍसिड टेस्ट

हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड आणि एक दगड घ्या. दगडावर सोने घासून त्यात मिश्रण घालावे. सोन्याव्यतिरिक्त इतर कोणताही धातू असल्यास आम्ल मिश्रण ते विरघळते.

Akshaya Tritiya 2024
Akshay Kumar Deepfake Video : बॉलीवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' ही अडकला 'डीपफेक'च्या जाळ्यात! व्हायरल व्हिडिओनं चाहत्यांना धक्का

चुंबकाचा वापर

सोन्याची शुद्धता मोजण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चुंबक टेस्ट. धातूंमध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. पण सोने हा नॉन-रिऍक्टिव आणि नॉन-चुंबकीय धातू आहे. जर तुम्ही चुंबकाजवळ खरे सोने ठेवले तर ते हलणार नाही. जर सोने चुंबकाला चिकटले तर हे सोने शुद्ध नाही आणि कमी कॅरेटचे आहे हे समजून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.