Akshaya Tritiya 2024 : अवघ्या काही दिवसांवर अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2024) सण येऊन ठेपला आहे. यंदा १० मे (शुक्रवारी) अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीया या सणाला हिंदू धर्मात खास असे महत्व आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन घरात गृहप्रवेश, लग्न आणि मुंडन यांसह सर्व प्रकारची शुभ कार्ये केली जातात.
या सर्व कार्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुग आणि सतयुग सुरू झाले असे मानले जाते. तसेच, अक्षय्य तृतीयेला युगादी तिथी असे ही म्हटले जाते. याच दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते, कारण हा दिवस सोने खरेदीसाठी देखील शुभ मानला जातो. परंतु, या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? आणि ते शुभ का मानले जाते? ते आपण जाणून घेणार आहोत.
एका पौराणिक कथेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेर यांना स्वर्गातील संपत्तीचे संरक्षक बनवण्यात आले होते. त्यामुळे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करून भगवान कुबेर यांची पूजा केल्याने कुटुंबात समृद्धी आणि ऐश्वर्य येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे, या दिवशी लोक आवर्जून सोने खरेदी करतात. तसेच, या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते अशी देखील लोकांची श्रद्धा आहे. (What is the story of Akshaya Tritiya?)
अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी करणे, अतिशय शुभ मानले जाते. या मागची पौराणिक कथा तर आपण वरील मुद्द्यात जाणून घेतली. विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मीच्या सन्मानार्थ लोक सोने, चांदी, मौल्यवान धातू, नवीन घर, नवीन मशीन खरेदी करतात.
लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवशी तुम्ही केलेली खरेदी आणि गुंतवणुकीचे मूल्य वाढते आणि त्याचा कधीच नाश होत नाही. तसेच, ते कायम तुमच्यासोबत राहते. या सर्व कारणांमुळे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आवर्जून सोन्या-चांदीची खरेदी करतात. (Why buy gold and silver on Akshaya Tritiya?)
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.