Alia Bhatt Fitness : फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, तुम्हीही ट्राय करून पाहा

लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की आलिया भट्टच्या फिटनेसचे रहस्य काय आहे.
Alia Bhatt Fitness : फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, तुम्हीही ट्राय करून पाहा
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करते. ती इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया भट्टच्या फिटनेसची सर्वाधिक चर्चा होते. खरं तर, आलिया आई झाल्यानंतरही स्लिम आहे. लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न असतो की आलिया भट्टच्या फिटनेसचे रहस्य काय आहे.

हा प्रश्न तुमच्याही मनात असेल तर आलियाच्या फिटनेसचे रहस्य योग आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या इन्स्टा पोस्टद्वारे योगा करताना अनेक प्रकारचे फोटो शेअर करत असते. यापैकी एक पोज म्हणजे व्हील पोज योग. चला जाणून घेऊया या आसनाचे काय फायदे होतात.

व्हील पोज योग कसा करावा?

सर्व प्रथम, आपल्या पाठीवर झोपा.

आता तुमचे गुडघे वाकवून तुमच्या पायाचे तळवे तुमच्या नितंबाजवळ आणा.

पाय समांतर असावेत आणि नितंब एकमेकांपासून दूर असावेत

आपल्या हाताचे तळवे आपल्या डोक्याजवळ ठेवा.

हाताची बोटे पायाच्या बोटांसारखीच ठेवा.

श्वास घ्या आणि आपले खांदे आणि नितंब जमिनीवरून उचला.

आपले डोके वर ठेवा आणि मानेवर जास्त भार टाकू नका.

शरीर वर उचलून गोलाकार हालचाल करा.

Alia Bhatt Fitness : फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, तुम्हीही ट्राय करून पाहा
Yoga For Acidity : अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दररोज ही योगासने करा!

व्हील पोज योगाचे फायदे

यामुळे शरीर लवचिक बनते.

हात, पाय आणि पाठीचा कणा मजबूत होतो.

छातीचे स्नायू उघडतात.

पोटाचे स्नायू मजबूत होतात.

हिप फ्लेक्सर आणि कोर मसल्स स्ट्रेच होतात.

हृदयाचे मसल्स स्ट्रेच होतात.

यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

ब्लड सर्कुलेशन चांगले होते.

त्वचा आणि केसांना पोषण मिळते.

बॉडी पॉश्चर सुधारते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.