Mental Health : कायम स्वत:ला दोष दिल्यास येऊ शकतं नैराश्य, या प्रकारे करा Depression दूर

परिस्थिती किंवा इतरांना दोष देण्याएवजी स्वत:वरच टीका करणं हा पर्याय सोपा वाटतं असला तरी भविष्यात त्याचे अनेक तोटे आहेत. यासाठी ही निगेटिव्ह सवय वेळीच दूर करणं गरजेचं आहे
सतत नका देऊ स्वतःला दोष
सतत नका देऊ स्वतःला दोषEsakal
Updated on

अनेकजण एखाद्या घटनेसाठी किंवा चुकीसाठी कायम स्वत:ला दोष देत राहतात. स्वत:ला दोष देऊन किंवा स्वत:ची टीका करून ते एकाप्रकारे स्वत:चा बचाव करत असतात. असं केल्याने आपल्याला इतरांची सहानभुती मिळेल किंवा किमान इतर कुणी टीका आपल्यावर टीका करणार नाही, या भावनेतून अनेकांना ही सवय Habbit जडून जाते. Always Cursing self may lead to mental depression

मात्र कायम स्वत:वर टीका केल्याने किंवा दोष देण्याची ही प्रवृत्तीच त्यांना घातक ठरू शकते. बालपणातील अत्याचार, लैंगिक शोषण आणि न्यूनगंड तसचं सोशल मीडियाचा Social Media जास्त वापर यामुळे स्वत:वर टीका करण्याची अनेकांना सवय लागते. मात्र यामुळे नैराश्य Depression येऊ शकतं. तसंच याचा आहारावर परिणाम होवू शकतो.

स्वत:ला दोष देणं किंवा टीका करण्याच्या सवयीमुळे तणाव आणि नैराश्य वाढून आत्महत्येची Suicide भावना बळावू शकते. तसचं गुन्हेगारी प्रवृत्ती देखील निर्माण होवू शकते. परिस्थिती किंवा इतरांना दोष देण्याएवजी स्वत:वरच टीका करणं हा पर्याय सोपा वाटतं असला तरी भविष्यात त्याचे अनेक तोटे आहेत. यासाठी ही निगेटिव्ह सवय वेळीच दूर करणं गरजेचं आहे. यासाठी तज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत.

मूळ शोधा- कोणत्याही समस्येचं निराकारण करण्यासाठी त्याचं मूळ शोधणं म्हणजेच त्याची सुरुवात कुठूण आणि कशी झाली हे जाणून घेणं गरजेचं आहे. यासाठीच self-criticize म्हणजेच तुम्ही स्वत:वर टीका किंवा दोष देण्यास कधीपासून आणि का सुरुवात केली हे जाणून घ्या.

काहीवेळेस एखाद्या घटनेमुळे किंवा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वत:वर टीका केल्याने तुम्हाला कदाचित चांगले परिणाम जाणवले असतील आणि त्यानंतर तुम्हाला ती सवय जडली असू शकते. यासाठीच तुम्ही सुरुवातीलाच कारण शोधलंत तर स्वत:ला दोष देणं बंद करू शकता.

हे देखिल वाचा-

सतत नका देऊ स्वतःला दोष
Symptoms of Depression : मन पोखरणारं नैराश्य म्हणजे नेमकं काय? त्याची लक्षणे काय आहेत

दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्या- अनेकदा आपल्या डोक्यामध्ये अनेक नकारात्मक विचार सतत फिरत असतात. यामध्ये अनेकदा आपण स्वत:लाच दोष देत असतो. यासाठी एखाद्या जवळच्या व्यक्तीची मदत घ्या. तुम्ही कधी स्वत:बद्दल नकारात्मक बोलता हे सांगण्यासाठी ते तुम्हाला मदत करू शकतात.

अर्थात यासाठी योग्य व्यक्तीची निवड करा ज्याला खरचं तुमच्यातील नकारात्मक विचार दूर करण्याची इच्छा आहे. तुमची जवळची विश्वासार्ह व्यक्ती तुमचा अशाप्रकारे विचार करण्यामागचं कारणं कदाचित तुम्हाला चुकिचं असल्याचं समजावू शकेल आणि तुम्हाला सकारात्मक विचाक करण्यास प्रेरित करेल.

तुम्ही खास मैत्रिण, तुमचे पार्टनर किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घेऊ शकता.

ध्यान आणि व्यायाम- मानसशास्त्रज्ञ तसचं मानसिक आरोग्य तज्ञांच्या मते व्यायाम आणि मेडिटेशन केल्याने स्वत:बद्दलची नकारात्मक भावना दूर करणं शक्य आहे. जर ध्यान किंवा मेडिटेशन करणं शक्य होतं नसेल, तर केवळ श्वसनाचे काही व्यायाम करा.

यावेळी स्वत:शी संवाद साधा. मी खूश राहू शकते. मी आरोग्यदायी राहू शकते, मी सुंदर आयुष्य जगू शकते, होय मी आरामात राहू शकते असं म्हणत व्यायाम करा. यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटेल.

आनंद साजरा करा- मनातील स्वत:विषयीची नकारात्मकता कमी कऱण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करा. अगदी रोज झोपण्यापूर्वी तुम्ही दिवसभरात स्वत:साठी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी किंवा समाजिक हेतूनं एखादं काम केलं असेल तर ते लिहून काढा.

अगदी कुणाला प्रवासात बसण्यासाठी जागा देण्यापासून ते सहकाऱ्यांना गुड मार्निंग म्हणण्यापर्यंत तसचं स्वत:साठी एखादी वस्तू खरेदी करणं यामुळे नकारात्मक विचारांपासून परावृत्त होता येतं.

हे देखिल वाचा-

सतत नका देऊ स्वतःला दोष
Depression Effects : नैराश्यातून जाणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञ सांगतात...

तटस्थ विचार करा- जर तुम्हाला स्वत:बद्दल लगेचच पॉझिटिव्ह विचार करणं शक्य नसेल तर तुम्ही तटस्थ विचार करून सुरुवात करू शकता. म्हणजेच माझी स्किन सुंदर आहे असं म्हणण्याऐवजी माझी स्किन चांगली असली तरी काय झालं असतं? असं म्हणून तुम्ही नकारात्मक विचारांवर मात करू शकता.

धडा शिका- काही वेळेस तुम्ही स्वत:ला दोष देण्याच्या वृत्तीतून काहीतरी धडा घेऊ शकता. या नकारात्मक विचारांमध्ये गुंतून राहण्याएवजी त्यातून धडा घ्या. म्हणजेच मी लठ्ठ आहेस असं म्हणत राहण्याएवजी. तुम्ही लठ्ठ आहात याची तुम्हाला जाणीव आहे. मग तुम्ही मी लठ्ठ आहे पण आता मला व्यायाम करणं गरजेचं आहे, असं म्हणत व्यायामासाठी प्रयत्न करा.

अशा प्रकारे तुम्ही स्वत:ला दोष देण्याच्या सवयीतून आणि नैराश्यातून बाहेर पडू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.