Amitabh Bachchan Fitness: बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांना पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन सध्या कोन बनेगा करोडपती या शोच्या १६ व्या सीझनचे होस्ट आहेत. ते अभिनयसाठी नाही तर फिटनेससाठी देखाल सोशल मिडियावर चर्चेत असतात. अमिताभ बच्चन एवढी ऊर्जा आणतात कुठून असा प्रश्न सर्वांना पडतो. अनेकवेळा ते आपल्या फिटनेसबद्दल बोलत असतात. जर तुम्हाला त्यांच्या फिटनेसबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा. तुम्हालाही आयुष्यात फिट राहायचे असेल तर त्यांच्याप्रमाणे जीवनशैली फॉलो करू शकता.
अमिताभ बच्चन तंदुरूस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी तुळशीच्या पानांचे सेवन करतात. नंतर नाश्त्यात प्रोटीन शेक, दलिया आणि बदाम यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करातात. तसेच नाश्त्यात आवळ्याचा रस आणि खजूर खायला त्यांना आवडते. तसेच फळ आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश करतात. बीग बीने अनेक वेळा माध्यमांशी बोलतांना आणि ब्लागमध्ये आहाराबद्दल माहिती दिली आहे.
तरूणपणी अमिताभ मिठाई, मासांहार आणि भात खुप खात होते. पण अलिकडील काळात त्यांनी मांसाहार आणि गोड पदार्थ खाणे बंद केले आहे.
अमिताभ आहाराकडे जेवढे लक्ष देतात तेवढेच व्यायामाकडे देखील देतात. ते नेहमी संतुलित आहार घेतात. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी योगा देखील करतात. सकाळी चालायला जातात. रोज रात्री पुरेशी झोप घेतात. फिटनेस ट्रेनरच्या माहितनुसार प्राणायमसारखे काही सोपे योगा करायला लावतात. तसेच त्यांना कार्डिओ करायला आवडते. यामुळे शरीर लवचिक राहते आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते.
अमिताभ अभिनय करताना धूम्रपान करताना आपण पाहिले असेल पण वास्तविक जीवनात ते यापासून दूर राहतात. तसेच मद्यपानापासूनही दूर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन मिठाई, केक आणि पेस्ट्री खात नाहीत.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.