Amla for Skin Care : हिवाळ्यात हवेच्या आद्रतेमुळे लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते, सतत साथीचे आजार पसरत असतात. शिवाय थंडीमुळे त्वचा खूप कोरडी पडते आणि केसही गळतात; यातून सुटका मिळावी म्हणून अनेक प्रकारच्या गोळ्या औषधं घेतात, त्यातली एक फेमस कॅप्स्यूल म्हणजे व्हिटाॅमीन ई ची.हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळा खाल्ला पाहिजे.
आवळ्यात संत्र्यापेक्षा आठ पट जास्त व्हिटॅमिन-सी आणि डाळिंबापेक्षा 17 पट जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात.
आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, वजन कमी करण्यास मदत करतो आणि केस आणि त्वचेसाठी खूप चांगला असतो. असं म्हणतात की हिवाळ्यात आवळा खाल्ल्याने खूप फायदे होतात. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना आवळ्याची चव आवडत नाही पण खरंतर याचे खूप फायदे आहेत.
आवळ्याचे फायदे
1. थायरॉईड मेंटेन करायला मदत करते.
2. केस गळणं थांबवतो.
3. केस पांढरे होत नाही.
4. अॅसिडिटी आणि इतर जठराच्या समस्या दूर होतात.
5. पचनशक्ती वाढते.
6. शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते.
7. हृदयासाठी चांगले आहे.
8. यामध्ये असलेले व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
9. वजन कमी करायला मदत करते.
10. त्वचेसाठी खूप चांगले कारण आवळ्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचेचे आजार जसे की, मुरुम, कोरडेपणा, पुरळ, लालसरपणा यापासून बचाव होतो.
आवळा कसा आंबवायचा?
साहित्य
पाणी - 1 ग्लास
हळद - 1 चिमूटभर
मीठ - 1/2 टीस्पून
आवळा - 10
कृती:
1. सर्वप्रथम आवळा धुवून स्वच्छ करा.
2. नंतर त्यात छोटे चीरे करा.
3. हळद, मीठ आणि आवळा 3-4 दिवस पाण्यात भिजत ठेवा.
4. ते खाण्यासाठी तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.