Anant Ambani Wedding : यूपीच्या या शहरातील 'हा' दुकानदार अनंत अंबानींच्या लग्नासाठी बनवणार चाट, या 5 गोष्टी असतील मेनूमध्ये...

लग्नात खाण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लग्नाच्या मेनूमध्ये अनेक पदार्थांचा समावेश केला जाईल, ज्यामध्ये यूपीच्या चाटचेही नाव आहे.
Anant Ambani Wedding
Anant Ambani Weddingsakal
Updated on

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै रोजी म्हणजेच आज होणार आहे. भारताबरोबरच परदेशातही लग्नाची चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर लग्नाच्या विधींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लग्नात काय खास आणि अनोखे आहे हे जाणून घ्यायची इच्छा प्रत्येकाला असते.

लग्नात खाण्यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. लग्नाच्या मेनूमध्ये अनेक पदार्थांचा समावेश केला जाईल, ज्यामध्ये यूपीच्या चाटचेही नाव आहे. अनंत अंबानींच्या लग्नात यूपीतील एका प्रसिद्ध दुकानातील चाट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चाट कोणत्या दुकानातील असेल?

अनंत अंबानींच्या लग्नात यूपीच्या बनारसची चाट दिली जाणार आहे. ही प्रसिद्ध चाट बनारसमधील प्रसिद्ध दुकान काशी चाट भंडारची असेल आणि इथलेच लोक तिथे चाट सर्व्ह करतील, असे सांगण्यात येत आहे. हे तेच दुकान आहे जिथे काही दिवसांपूर्वी नीता अंबानी गेल्या होत्या. बनारसमध्ये नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देण्यासोबतच काशी चाट भंडारलाही भेट दिली आणि नीता अंबानी यांनी त्यांना लग्नाला येण्यास सांगितले.

Anant Ambani Wedding
India's Wedding Industry: शाही लग्नांचा थाटमाट आणि अर्थकारणाचा संबंध समजून घ्या. काय म्हणतंय Statistics?

वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत काशी चाट भंडारच्या मालकाने सांगितले की, 'नीता अंबानी येथे आल्या आणि त्यांनी 5 पदार्थ खाल्ले आणि त्यांना ते खूप आवडले. त्यांनी आम्हाला लग्नात स्टॉल लावण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि आमची टीम लग्नाला जाणार आहे. त्यांनी इथे पाच गोष्टी खाल्ल्या, टिक्की चाट, टमाटर चाट, पालक चाट, कुल्फी इत्यादींचा समावेश आहे'. नीता अंबानी इथे आल्याने त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मेनूमध्ये या 5 चाट असणार

दुकानमालकाच्या म्हणण्यानुसार, त्याला लग्नासाठी पाच चाट बनवण्याची ऑर्डर मिळाली असून तो लग्नात पाच चाट सर्व्ह करणार आहे. त्या पाच गोष्टींमध्ये टिक्की चाट, टोमॅटो चाट, पालक चाट, चना कचोरी आणि कुल्फी यांचा समावेश आहे. याशिवाय मेनूमध्ये अनेक पदार्थ आहेत.

Chitra kode:

Related Stories

No stories found.