Anant Ambani Disease : 'या' गंभीर आजारामुळे अनंत अंबानींना घ्यावे लागले स्टेरॉईड्स; त्यामुळेच वाढलं वजन.. जाणून घ्या

'या' गंभीर आजारामुळे अनंत अंबानींना घ्यावे लागले स्टेरॉईड्स
Anant Ambani Disease
Anant Ambani Diseasesakal
Updated on

अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला गुजरात जामनगर येथे होणार आहे. अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार या प्री-वेडिंग कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. यात पॉप आयकॉन रिहाना, अर्जित सिंह आणि दिलजीत दोसानज सारखे कलाकार आहेत. जामनगरच्या रिलायन्स ग्रीन कॉम्पलेक्समध्ये 1 मार्चपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

अनंत अंबानीने 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. मात्र अचानक त्याचे वजन पुन्हा वाढले. अनंत अंबानी यांच्या जीवनशैलीची सर्वत्र चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, अनंतचे वजन आधी 208 किलो होते. पण वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे त्याने आपले वजन कमी केले. TOI च्या बातमीनुसार, 2017 मध्ये एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले की, अनंतला दम्याचा त्रास आहे. त्यामुळे त्याला भरपूर स्टिरॉइड्स घ्यावे लागतात. त्यामुळे त्याला स्थूलपणाचा आजार जडल्याचं नीता अंबानी यांनी नमूद केलं. त्यामुळे अनंतचे वजन वाढले.

रोज व्यायाम करतो

अनंतचे वजन 208 किलो होते पण 2016 मध्ये त्याने वजन कमी करून सर्वाना चकित केले होते. त्याच्या या नव्या लूकबद्दल इंटरनेटवर तूफान चर्चा सुरू होती. अनंत रोज 5-6 तास व्यायाम करतो. तसेच रोज 21 किमी चालतो. कार्डिओ व्यायाम देखील करतो.

वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार

अनंतने झिरो-शुगर, हाय-प्रोटीन आणि लो-फॅट लो-कार्ब आहार घेतला. तो दररोज 1200-1400 कॅलरीज घेत होता. त्याच्या आहारात ताज्या हिरव्या भाज्या, स्प्राउट्स आणि दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर आणि दूध यांचा समावेश होता. वजन कमी करण्याच्या प्रवासात त्याने सर्व जंक फूड सोडले.

Anant Ambani Disease
Radhika Merchant Fitness : राधिका मर्चंटच्या सौंदर्य आणि फिटनेसचे रहस्य आहे शास्त्रीय नृत्य, जाणून घ्या त्याचे फायदे

अनंत अंबानींचे वजन पुन्हा वाढले

राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या 2020 च्या लीक झालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये, नेटिझन्सच्या लक्षात आले की अनंतचे वजन पुन्हा वाढले आहे. डिसेंबर 2022 मध्ये इशा अंबानीच्या जुळ्या मुलांचे स्वागत करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हाही हेच दिसून आले.

स्टिरॉइडमुळे वजन वाढते का?

अस्थमा अँड लंग्स ऑर्गनायझेशन यूकेच्या मते, जर एखाद्या रुग्णाला अस्थमा असेल तर व्यायाम करणं किंवा अ‍ॅक्टिव्ह राहणं कठीण जातं. तसेच खूप काळ स्टिरॉइड्स घ्यावे लागतात. त्यामुळे सामान्यांपेक्षा जास्त भूक लागत राहते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. स्टिरॉइडयुक्त औषधांमुळे शरीरात पाणी साठते, त्यामुळे शरीर सूजण्याचा धोका देखील असतो. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.