Anant Radhika Pre-Wedding : अनंत-राधिकाचे प्री-वेडींग झाले तो इटली देश आहे सर्वात सुंदर, नैसर्गिक सौंदर्याची होते उधळण

रोम शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाज्वल्य इतिहास आहे
Anant Radhika Pre-Wedding
Anant Radhika Pre-Weddingesakal
Updated on

Anant Radhika Pre-Wedding :

सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 29 मे पासून इटलीमध्ये मोठ्या क्रूझवर सुरू होता. हे दोघे 12 जुलै रोजी मुंबईत विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या इटलीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या प्री-वेडिंगशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सर्वांनाच या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाबद्दल विचार करण्यास भाग पाडत आहेत.

अर्थात मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमावर करोडो रुपये खर्च केले असतील, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इटलीसारख्या रोमँटिक देशाची सफर कमी पैशातही करता येते. चला जाणून घेऊया इटलीतील काही ठिकाणांबद्दल.

Anant Radhika Pre-Wedding
Italy : ११७ बेटं, १७७ कालवे व ४०९ पुलांनी एकमेकांना जोडलेलं रोमन साम्राज्याच्या राजधानीचं हे अनोखं शहर..!

इटलीला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिना सर्वोत्तम मानला जातो. या हंगामात येथे गर्दी नसते आणि हवामानही चांगले असते.

रोम

रोम शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाज्वल्य इतिहास आहे. रोम हे इटलीमधील सर्वात आकर्षक शहरांपैकी एक आहे. बऱ्याच पर्यटकांना असे वाटते की रोम केवळ प्राचीन स्थळे, चर्च आणि वारसा आहे. पण ते खरे नाही. रोममध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. नेत्रदीपक संग्रहालये, विलक्षण खाद्यपदार्थ आणि वास्तुशास्त्रीयदृष्ट्या समृद्ध लँडस्केप्स. रोमचा प्रत्येक कोपरा त्याच्या वैभवशाली भूतकाळात आणि मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन घडवतो.

मिलान

मिलान ही इटलीची फॅशन राजधानी आहे. मिलान हे उच्च श्रेणीची दुकाने, आकर्षक डिझायनर बुटीक आणि ट्रेंडिंग कलाकुसरांनी भरलेले शहर आहे. मिलानची आर्ट गॅलरी, वास्तुशास्त्रीय चमत्कार, ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा पहायला आवडतो. प्रसिद्ध लिओनार्डो दा विंची संग्रहालय मिलान येथे स्थित आहे आणि सर्वात प्रमुख आकर्षण आहे.

Anant Radhika Pre-Wedding
Satara Tourism : पावसाळ्यात कास, बामणोली, ठोसेघरसह महाबळेश्वरातील हुल्लडबाज पर्यटकांवर राहणार पोलिसांचा वॉच

पियाजा डेल कॅम्पो सिएना

पियाजा डेल कॅम्पो सिएन्ना हे इटलीतील सर्वात सुंदर ठिकाण आहे. हे ठिकाण टक्सनचे सर्वात ऐतिहासिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्ही घोड्यांच्या शर्यतीचा आनंद घेऊ शकता. इथे वर्षातून दोनदा घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. ज्याला लाखो लोक भेट देतात.

पॉम्पेई शहर

पॉम्पेई हे शहर इटलीच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेले शहर आहे. जे काही वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उध्वस्त झाले होते. या स्फोटात संपूर्ण शहर गाडले गेले. हे शहर 1200 वर्षांच्या कालावधीत उत्खनन केले गेले होते ज्यामुळे येथील लोकांच्या जीवनाची माहिती मिळते.

Addie Mannan
Anant Radhika Pre-Wedding
Chandoli Tourism : चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी खुले; तब्बल 3440 पर्यटकांनी लुटला पर्यटनाचा आनंद

सॅन जिमिग्नानो

सॅन जिमिग्नानो हे दगडी टॉवरसाठी जगप्रसिद्ध असलेले इटलीतील टस्कनी येथील एक छोटेसे गाव आहे. इथे १४ दगडांचा टॉवर हे ठिकाण पर्यटकांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे:

व्हॅली ऑफ द टेंपल

जर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी आवडत असतील तर तुम्हाला इटलीतील या व्हॅली ऑफ द टेंपलबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. हे सिसिली व्हॅलीमध्ये स्थित आहे जेथे 2400 वर्षांहून अधिक जुनी अनेक ग्रीक मंदिरे आहेत.

Anant Radhika Pre-Wedding
Shirdi Spiritual Tourism: देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे, पत्रकारांच्या कार्यशाळेत आशावाद

इटलीचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ

जर तुम्ही इटलीला गेलात आणि इथल्या स्वादिष्ट पदार्थाची चव घेतली नाही तर तुमची भेट अपूर्ण समजली जाईल. होय, जगभरातील खाद्यप्रेमी पिझ्झा, बोटारगा, लसग्ना, फिओरेन्टिना स्टीक, रिबोलिटा, पोलेन्टा, ओसोबुको, रिसोट्टो, कार्बनारा आणि ट्रफल्स इत्यादी खाण्यासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.