Anant-Radhika Wedding : श्रीमंत अंबानींचे व्याहीही काही कमी नाहीत; मर्चंट, पिरामल, मेहताही आहेत अब्जाधीश

Anant-Radhika Wedding :मुकेश अंबानींच्या दोन्ही व्याह्यांप्रमाणेच त्यांचे तिसरे व्याहीही श्रीमंतांपेक्षा कमी नाही. आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे.
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika Weddingesakal
Updated on

Anant-Radhika Wedding :

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी लवकरच लग्नसोहळा पार पडणार आहे. हा केवळ लग्न सोहळा नसून तो एक शाही विवाह आहे. 12 जुलै 2024 रोजी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्यांची मंगेतर राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मामेरू आणि संगीत सोहळ्यानंतर सोमवारी अंबानी कुटुंबात मेहंदी आणि हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे. मुकेश अंबानींच्या दोन्ही व्याह्यांप्रमाणेच त्यांचे तिसरे व्याहीही श्रीमंतांपेक्षा कमी नाही. आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. जाणून घेऊया राधिकाचे वडील काय करतात.

Anant-Radhika Wedding
Mukesh Ambani : भारताप्रमाणेच आशियातही अंबानींच्या श्रीमंतीचा दबदबा

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हेल्थकेअर कंपनी चालवणाऱ्या वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी लग्न करणार आहे. वीरेन मर्चंट, अंबानींचे तिसरे व्याही बनणार आहे. ते हेल्थकेअर कंपनी एन्कोरचे सीईओ आहे.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, 2000 कोटी रुपयांची ही कंपनी चालवणाऱ्या राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबाची सून होणारी राधिका मर्चंटही वडिलांच्या व्यवसायात मदत करते.

Anant-Radhika Wedding
Shah Rukh Khan & Mukesh Ambani : कोट्यवधींचे मालक असलेल्या मुकेश अंबानी आणि शाहरुख यांनी घेतला ३१ रुपयांच्या ORS ड्रिंकचा आस्वाद ; नेटकरी म्हणाले...

ईशा अंबानीचे सासरे - अजय पिरामल

मुकेश अंबानी व्याही आणि ईशा अंबानीच्या सासऱ्यांकडेही अफाट संपत्ती आहे. ईशाचे सासरे अजय पिरामल आहेत. ज्यांचा पीरामल ग्रुप देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट समुहामध्ये समाविष्ट आहे. फार्मा, हेल्थकेअर आणि वित्तीय सेवांचा व्यवसाय करणाऱ्या पिरामल ग्रुपच्या जगातील ३० देशांमध्ये शाखा आहेत.

अजय पिरामल यांच्याशिवाय त्यांची पत्नी स्वाती पिरामल या पिरामल बोर्डाच्या उपाध्यक्षा आहेत. मुलगी नंदिनी आणि मुलगा आनंद पिरामल यांचाही बोर्डात समावेश आहे. फोर्ब्सनुसार, अजय पिरामल यांची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25,051 कोटी रुपये) आहे.

Anant-Radhika Wedding
Mukesh Ambani: भारतात नाही तर या देशात झाला मुकेश अंबानींचा जन्म

आकाश अंबानींचे सासरे - अरूण मेहता

अरूण मेहता हे मुकेश अंबानी यांचे नातेवाईक आहेत, मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचे अरुण रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी लग्न झाले होते. अरूण मेहता यांची गणना देशातील बड्या हिरे व्यावसायिकांमध्ये केली जाते. आणि त्यांच्या रोझी ब्लू कंपनीचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. या कंपनीचा जगातील टॉप डायमंड कंपन्यांमध्ये समावेश होतो. एकट्या भारतातील 26 शहरांमध्ये त्याची 36 पेक्षा जास्त शॉप्स आहेत.

रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बिझनेस टुडे वर प्रकाशित झालेल्या आधीच्या अहवालानुसार, अरुण रसेल मेहता यांची आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये एकूण संपत्ती सुमारे 3,000 कोटी रुपये होती. 

Anant-Radhika Wedding
Mukesh Ambani : करोडपती असणारे मुकेश अंबानी नाश्त्यामध्ये रोज खातात 'हा' एकच पदार्थ

मुकेश अंबानी जगातील अव्वल श्रीमंतांमध्ये गणले जातात, मुकेश अंबानींच्या व्याही मंडळींकडे तिन्ही व्यक्तींकडे अफाट संपत्ती असली तरी संपत्तीच्या बाबतीत ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामल पुढे आहेत.

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेट वर्थवरील रिपोर्ट ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 120 अब्ज डॉलर्स आहे. या आकडेवारीसह, ते जगातील 11 व्या आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी 2024 पर्यंत मुकेश अंबानींची नेटवर्थ 23 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.