Anant-Radhika Wedding : मुलाच्या लग्नासाठी वरमाई नटली; अनंतच्या लग्नासाठी खरेदी केली गोल्ड प्लेटेड साडी

Nita Ambani : या खास साडीची किंमत अन् स्पेशालिटी ऐकून थक्क व्हाल
Anant-Radhika Wedding
Anant-Radhika Weddingesakal

Anant-Radhika Wedding :

मुलाच्या लग्नात नटावं अन् साऱ्यांनी आपलंच कौतुक करावं असं प्रत्येक वरमाईला (वराची आई) वाटत असतं. मुलगा लग्नाच्या वयाचा झाला की, त्याच्या आईलाही नवी उपाधी मिळते. ती आई अन् सासू पेक्षा वरमाई म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात तर या गोष्टीला हौसेने म्हटलं जातं. वराच्या आईचा शब्द मोडायचा नसतो. मग, अनंत अंबानीची वरमाई कशी बरी मागे राहील.

वाराणसी दौऱ्याच्या दिवशी नीता अंबानी यांनी बनारसच्या विणकरांनी बनवलेल्या साड्यांच्या स्टॉलला भेट दिली होती. आणि याच स्टॉलवर नीता यांनी लाख रूपयाहून अधिक किंमतीची साडी खरेदी केली.

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Wedding : अनंत पेक्षा राधिका आहे मोठी, पत्नी वयाने मोठी असण्याबाबत शास्त्र काय म्हणत?

वाराणसीतील काशी विश्वेनाथाच्या दर्शनाला नीता अंबानी गेल्या होत्या. तेव्हा तिथे त्यांनी मंदिरात देवांचे दर्शनही घेतले आणि साडीच्या हातमाग कारखान्यालाही भेट दिली. त्यानंतर जेव्हा त्या हॉटेलवर थांबल्या होत्या. तेव्हा तिथे खास नीता यांच्यासाठी साडीचे स्टॉल लावण्यात आले. यावेळी त्यांनी कोनिया ट्रेंडची साडी निवडली. त्यांनी ती स्वतःसाठी विकत घेतली. या साडीची किंमत 1 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. (Anant -Radhika Wedding)

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Pre-Wedding : अनंत-राधिकाचे प्री-वेडींग झाले तो इटली देश आहे सर्वात सुंदर, नैसर्गिक सौंदर्याची होते उधळण

अनंत आणि राधिका मर्चंट हे जोडपे 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत. हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. लग्नाचे सोहळे ३ दिवस चालणार आहेत. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे. 14 जुलै रोजी मंगल उत्सव म्हणजेच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्षा नीता अंबानी त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी काशी विश्वनाथ मंदिरात आल्या होत्या. बनारस येथील नीता अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी 1 लाख 80 हजार रुपयांची एक लाख रूपयांची साडी खरेदी केली होती. एवढेच नाही तर त्यांना लाखो रुपयांच्या आणखी 60 साड्याही आवडल्या आहेत.

वाराणसीच्या भेटी दरम्यान दौऱ्याच्या दिवशी नीता अंबानी यांनी रात्री उशिरा तेथील एका हॉटेलमध्ये बनारसच्या विणकरांनी बनवलेल्या साड्यांचा स्टॉल लावला. मग वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या पाहिल्या. सर्व साड्यांपैकी नीता अंबानी यांना कोनिया ट्रेंडची लाख बूटी साडी आवडली होती, ती त्यांनी स्वतःसाठी खरेदी केली होती.

Anant-Radhika Wedding
Anant Radhika Pre Wedding : अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमधील डान्ससाठी शाहरुख, आमिर अन् सलमाननं किती पैसे घेतले?

नीता अंबानींच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी 60 साड्या घेऊन हॉटेलमध्ये गेलो. रात्री उशिरा, नीता अंबानी यांनी स्वतः ही साडी पाहिली आणि त्यांना सोन्या-चांदीची आणि लाल रंगाची लाख बुटी साडी आवडली. ती साडी बनवण्यासाठी 50 ते 60 दिवस लागले. नीता अंबानींनी स्वतःसाठी निवडलेल्या साडीची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे, असे साडी व्यावसायिक अमरेश कुशवाह यांनी सांगितले.

या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ते रेशमी कापडावर विणली गेली आहे. त्यावर चांदीची तार असून त्यावर सोन्याचे पाणी लावलेला लेप आहे. ही साडी 60ते 62 दिवसांत तयार करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com