Wedding Fashion : अंबानींच्या सुनांचा थाटच वेगळा! वेडिंग फंक्शनमध्ये घातले आई आणि आजीचे दागिने...

मोठी गोष्ट म्हणजे या भव्य लग्नातही श्लोका आणि राधिका आपल्या आई आणि आजीचे दागिने घालून आपली राजेशाही स्टाईल दाखवत आहेत.
Wedding Fashion
Wedding Fashionsakal
Updated on

12 जुलै रोजी म्हणजेच आज देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मार्चपासूनच त्यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते.

आता जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. एकीकडे बॉलीवूडमधील अभिनेत्री सुंदर पोशाखात लग्नाच्या कार्यक्रमांना पोहोचत असतानाच, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपला रॉयल अंदाज दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत.

विशेषतः जर आपण याबद्दल बोललो तर, अंबानी कुटुंबातील सून म्हणजेच श्लोका अंबानी आणि होणारी सून राधिका मर्चंट यांचा रॉयल अंदाज पाहण्यासारखा होता. मोठी गोष्ट म्हणजे या भव्य लग्नातही श्लोका आणि राधिका आपल्या आई आणि आजीचे दागिने घालून आपला रॉयल अंदाज दाखवत आहेत.

श्लोकाचा मेहेंदी लूक

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका लग्नाच्या प्रत्येक समारंभात सर्वात सुंदर पोशाख परिधान करताना दिसत आहे. तिचे हे सर्व लूक मोठी बहीण दिया मेहता हिने स्टाईल केले आहेत. अलीकडेच तिने अनंत राधिकाच्या मेहेंदीसाठी सुंदर टिश्यू साडी नेसली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.

Wedding Fashion
Anant Ambani Marriage Gift : अनंत राधिकाच्या लग्नासाठी अंबानींनी रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना दिली खास भेट, गिफ्ट बॉक्समध्ये काय आहे?

ज्वेलरी आहे खास

हा साडी लुक पूर्ण करण्यासाठी तिने आजीचा सोन्याचा नेकपीस घातला होता. या नेकलेसची डिजाईन अतिशय अनोखी आणि सुंदर होती. यासोबतच तिने हातात बांगड्याही घातल्या होत्या, ज्या सुंदर दिसत होत्या.

राधिकाचे मामेरू लूक

राधिका मर्चंटने लग्नापूर्वी आयोजित केलेल्या मामेरू समारंभात सुंदर बंधेज लेहेंगा परिधान केला होता. या सोनेरी आणि गुलाबी लेहेंग्यात राधिका कमालीची सुंदर दिसत होती. या खास लेहेंग्याबद्दल बोलायचे झाले तर राधिकाचा हा घागरा 35 मीटरचा होता. त्यावर दिसणारी एम्ब्रॉयडरी सोन्याच्या जरदोसी लेसने केली होती.

ज्वेलरी आहे खास

राधिकाने या लेहेंगा लूकसोबत तिच्या आईची ज्वेलरी घातली होती. राधिकाने तिची आई शैला विरेनमर्चंट यांचे दागिने या सुंदर बंधेज लेहेंग्यासह परिधान केले होते. राधिकाच्या आईने ही ज्वेलरी तिच्या मामेरू फंक्शनमध्ये परिधान केली होती. राधिका तिच्या आईच्या चोकरमध्ये राजकुमारीसारखी दिसत होती, तिच्या कमरेला सोन्याचा कमरपट्टा, मोठे कानातले आणि हेवी मांग टिक्का होता.

Chitra kode:

Related Stories

No stories found.