अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी होय. संकष्टी चतुर्थीच्या सर्व दिवसांना अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीला 'संकटहार चतुर्थी' म्हणूनही ओळखले जाते. हा गणपतीला समर्पित केलेला शुभ दिवस आहे.
असं म्हणतात की अंगारकी संकष्टी केली वर्षभराच्या सर्व संकष्टींचे पुण्य मिळते. त्यामुळे इतरवेळी उपवास न करणारे लोकही अंगारकी संकष्टीचा उपवास करतात. तुम्हीही बाप्पासाठी आज उपवास करणार असाल तर या काही स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी आहेत.
शिंगाड्याचा शिरा
वाटीभर शिंगाड्याचे पीठ, पाऊण वाटी साजूक तूप, पाऊण वाटी साखर, अर्धा टी स्पून वेलदोडा पूड, दीड वाटी पाणी
कृती :
कढईत साजुक तूप गरम करून त्यात शिंगाड्याचे पीठ घालून पीठ खमंग भाजून घ्यावे. पीठ भाजून तूप सुटू लागले की त्यात दीड वाटी उकळते पाणी घालून नीट ढवळून झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ द्यावी.
दीड वाटी साखर घालून नीट ढवळावे, त्यात अर्धा चमचा बेलदोडा पूड घालावी. झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा द्याव्यात.
शिंगाड्याचे पीठ भाजायला तूप जास्त लागते. मंद आचेवर खमंग भाजावे, नाहीतर करपट होऊन पीठ काळे होऊन शिरा काळा होतो व कडवट लागतो. आवडीनुसार काजू-बदामाचे व बेदाणे घालावेत.
शिंगाड्याचे लाडू
साहित्य - २ वाट्या शिंगाड्याचे पीठ, १ वाटी साजूक तूप, १ वाटी पिठीसाखर, १ चमचा वेलदोडे पूड, २ टे. स्पून खमंग भाजलेल्या दाण्याचे जाडसर कूट.
कृती -
कढईत तूप घालून मंद आचेवर शिंगाड्याचे पीठ भाजावे व परातीत काढावे. थंड होत आले की पीठीसाखर, वेलदोडा पूड, दाण्याचे कूट घालून, चांगले मळून, लाडू वळावेत.
हे लाडू बरेच दिवस टिकतात त्यामुळे अगोदर करून ठेवता येतात प्रवासात पण नेता येतात. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १० लाडू होतात.
शेंगदाण्याचे कूट घातल्याने लाडू खाताना चिकटत नाहीत पण कूट न घालता केलेला लाडू जास्त खमंग लागतो.
(संबंधित रेसिपी या जयश्री देशपांडे यांच्या ‘हमखास पाकसिद्धी’ या पूस्तकातून घेण्यात आल्या आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.