Angarki Sankashti Chaturthi 2024: अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा 'हे' उपाय, गणपती बाप्पा होतील प्रसन्न

Angarki Sankashti Chaturthi 2024: यंदा मंगळवारी २५ जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. यादिवशी गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
Angarki Sankashti Chaturthi 2024:
Angarki Sankashti Chaturthi 2024: Sakal
Updated on

Angarki Sankashti Chaturthi 2024: यंदा अंगारकी संकष्टी चतुर्थी २५ जूनला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खुप महत्व आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पुजा केल्यास मनोकामना पुर्ण होतात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने अनेक समस्या दूर होतात. घरात सुख-समृद्धी लाभते. चला तर मग जाणून घेऊया चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावे.

अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा पुढील उपाय

मेहनत करूनही यश मिळत नसेल तर भगवान गणपतीची पूजा करणे फायदेशीर ठरेल. आज भगवान गणेशाच्या 'श्री गणेशाय नमः ' मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. यामुळे तुम्हाला फायदा मिळेल.

तुम्हाला व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगती हवी असेल तर चतुर्थीला गणपती बाप्पाला 11 गाठी दुर्वा अर्पण करावे. यामुळे तुम्हाला व्यवसायात कोणतेही नुकसान होणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा सामना करावा लागणार नाही.

Angarki Sankashti Chaturthi 2024:
Alia Bhatt Pantsuit Dress : पँटसूट ड्रेसमध्ये आलिया भट्टचा ग्लॅमरस लूक, जाणून घ्या सब्यसाचीने डिझाईन केलेल्या ड्रेसचं वैशिष्ट्य

संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी संकष्टी चतुर्थीला गणेशाला मोदक किंवा लाडू अर्पण करावे. याचा फायदा तुम्हाला मिळेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बुधवारीही हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

जर तुम्हाला ऋणातून मुक्ती मिळवायची असेल तर आजच श्रीगणेशाच्या मंदिरात जा आणि विधीनुसार त्यांची पूजा करण्यासोबतच 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करावा.

तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असे वाटत असेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्यासोबतच या मंत्राचा सुमारे 11 वेळा जप करा.

गणपती बाप्पाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या?

जास्वंदाचे लाल फुल

मोदक

लाडू

दुर्वा

नारळ

अक्षता

गणपती बाप्पाला कोणत्या वस्तू अर्पण करू नये?

तुळशीचे पान

केतकीचे फुल

तुटलेल्या अक्षता

पांढऱ्या वस्तू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.