Anger Management : प्रत्येक गोष्टीवर चिडण्याची तुम्हालाही सवय झालीय, असं करा स्वत:ला शांत

शारीरिक ऍक्टिव्हीटी तुम्हाला प्रत्येक तणावापासून मुक्त करू शकतात
Anger Management
Anger Managementesakal
Updated on

Anger Management :

काही लोकांना सतत हसण्याची इतरांना हसवण्याची सवय असते. गप्पा गोष्टी, सर्वांशी छान मस्त बोलत ते जगत असतात. अशा लोकांचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. तर, याउलट सतत रागवणाऱ्या, सतत चिडचिड करणाऱ्या लोकांचे आयुष्य घटते.

सतत राग करणारे लोक एखाद्याने मोकळेपणाने बोलले तरी रागावतात. कारण, त्यांना त्या रागाची सवय झालेली असते. राग माणसाला वेडा देखील बनवू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण कसे ठेवायचे हे प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे.

रागावर नियंत्रण मिळवणे अशक्य नाही. पण ते तितकं सोप्पही नाही. कारण, आपल्या शरीरात जसे रक्त वाहते तसे जन्मभर राग-राग केलेला आपल्या शरीरात भिनतो. त्यामुळे त्याला आपल्या पासून दूर ठेवण्यासाठी काही कष्ट तुम्हाला करावे लागणार आहेत.

Anger Management
Stress In Child : का वाढतोय मुलांवर एवढा ताण? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

रागाला दूर ठेऊन स्वत:च्या स्वभावाला शांत कसं बनवायचं याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ज्या तुम्हाला डोकं शांत ठेवायला मदत करतील.  

शारीरिक ऍक्टिव्हीटी

शारीरिक ऍक्टिव्हीटी तुम्हाला प्रत्येक तणावापासून मुक्त करू शकतात. राग व्यवस्थापनासाठी देखील हा एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा तुम्ही काही नकारात्मक विचार करत असाल तेव्हा तुम्ही काही साधे व्यायाम करू शकता किंवा फिरायला जाऊ शकता. यामुळे तुम्हाला खूप हलके वाटेल आणि तुमचा राग थोडा शांत होईल. तसेच मेडीटेशन केल्यानेही फरक जाणवतो.

Anger Management
Stress Management: कुणी ताण देता का ताण?


राग व्यवस्थापन तंत्र

काही लोक असे असतात की ज्यांना लहानसहान गोष्टींचा राग येतो. त्यामुळे सर्वप्रथम तुमची तणाव पातळी कमी करण्याचा विचार करा. त्यासाठी योग, ध्यान, संगीत, नृत्य, सायकलिंग यासारख्या छोट्या व्यायामांचा तुमच्या दिनक्रमात समावेश करावा. या गोष्टी केल्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे राग नियंत्रणात राहतो.


राग व्यक्त करा

तुमचा राग व्यक्त करा. कारण राग बाहेर पडू न देणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी किंवा तुमच्यावर विश्वास ठेवता येईल अशा व्यक्तीशी बोला आणि त्याच्याशी बोलल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल.

राग शांत करण्यासाठी, 1 ते 10 पर्यंत मोजा. यामुळे तुम्हाला तुमच्या आंतरिक भावनांवर नियंत्रण ठेवण्याची कला मिळते. यासोबतच तुम्ही धीर धरायला शिका.

Anger Management
Stress Relief Foods : ताण-तणावापासून सुटका हवीय? मग, आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

आवडते काम करा

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अधिक राग आलेला असेल तेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी जा. तुम्हाला जे आवडते तो पदार्थ खा, शॉपिंग करा. पण रागाचा विचार करू नका. जेव्हा तुम्हाला शांत झालोय असे वाटेल तेव्हा शांतपणे त्या व्यक्तीशी बोला.

स्ट्रेस बॉल

राग शांत करण्यासाठी तुम्ही स्ट्रेस बॉलची मदत घेऊ शकता. स्ट्रेस बॉल हा एक लवचिक बॉल आहे जो रागाच्या वेळी हाताने दाबून राग शांत करता येतो. हा बॉल राग शांत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.