Fashion Tips: सोळा शृंगारांपैकी एक असलेले पैंजण आता बनला फॅशन ट्रेंड

पैंजणाच्या आवाजामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. पैंजणातून निर्माण होणाऱ्या नाजूक आवाजाने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
anklets
ankletsSakal
Updated on

जन्मलेल्या बाळापासून, लग्न झालेल्या महिलांपर्यंत आवडणाऱ्या गोष्टींमध्ये परंपरागत दागिना म्हणजे पैंजण! पैंजणच्या जवळपास १०० डिझाइन्स आहेत. महिलांच्या सोळा शृंगारांपैकी एक असलेले पैंजण आरोग्यासही उपयुक्त आहे. पैंजण आरोग्याबरोबरच आता फॅशन स्टेटमेंटही ठरत आहे.

पैंजणाच्या आवाजामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. पैंजणातून निर्माण होणाऱ्या नाजूक आवाजाने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. भारतात व इतर देशांत विविध प्रकारचे धर्म आणि त्या धर्माशी संबंधित संस्कृती पाहायला मिळते. सर्वच देशांमध्ये जसे भाषा व संस्कृतीमध्ये बदल आढळतात; तसेच पोशाख आणि दागिन्यांमध्ये भरपूर डिझाइन पाहायला मिळतात. पण, काही दागिन्यांमध्ये साम्य असते. कधी-कधी दागिने घालण्यामागचे कारणही सारखेच असते; कारण दागिना परंपरेशी जोडलेले एक बंधन आहे.

चांदी वापरल्याने महिलांमधील हॉर्मोन बदलामुळे होणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. चांदीचे पैंजण पायाच्या त्वचेला घासले जाते आणि धातूचे गुण शरीरात येतात. यामुळे पायावर येणारी सूज, टाचदुखी, गुडघेदुखी यांसारख्या व्याधींपासून आराम मिळतो. चांदीच्या वापरामुळे शरीरातील ऊर्जा वाढते, रक्तप्रवाह सुरळीत होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आजकाल पैंजण फॅशन स्टेटमेंट म्हणूनही वापरली जाते. विविध डिजाइन्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. आजकालच्या ट्रेंडमध्ये विविध रंगांच्या मण्यांच्या किंवा मौल्यवान दगडांच्या पैंजणांचाही समावेश आहे, तर काही नाजूक साखळीच्या आणि काही जटील नक्षीदार डिझाइन्स आहेत. पैंजणांमध्ये गोड आवाज येणारे घुंगरू असतात.

पैंजणमध्ये जवळपास १०० डिझाइन्स आहेत. राजकोट, इंदौरी, कोल्हापुरी पैंजणची मागणी मोठ्या प्रमाणात असते. शाळा, कॉलेज, ऑफिकला जाणाऱ्या मुली, महिला बारीक मुक्या घुंगराचे पैंजण वापरण्यास पसंती देतात. सणावराला मारवाडी, कोल्हापुरी, हैदराबादी पैंजणची मागणी जास्त असते. १० ग्रॅम ते २५० ग्रॅमपर्यंतच्या फॅशनेबल पैंजणला मागणी जास्त आहे.

- विजय तिवारी, सोने-चांदी व्यापारी

पैंजणाचे सांस्कृतिक महत्त्व

लग्नानंतरच्या काळात नववधूंना पैंजण घालण्याची परंपरा (प्रथा) आहे. पैंजण हे सुहाग चिन्ह म्हणूनही मानले जाते.

काही घराण्यांमध्ये तर लहान मुलींनाही बालपणापासूनच पैंजण घालण्याची परंपरा असते.

पैंजणाचे प्रकार

जाड घुंगराचे पैंजण

मुक्या घुंगरांचे पैंजण

तोडे पैंजण, साखळी पैंजण

माणिकरत्न पैंजण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.