Annapurna Devi Temple : इथे अन्नपूर्णा देवीला अर्पण केले जातात मेन्स्ट्रुअल कप आणि सॅनिटरी पॅड, सर्वच स्तरातून होतंय कौतुक

या उपक्रमाचं विविध स्तरांमधून कौतुक होतंय
Annapurna Devi Temple
Annapurna Devi Templeesakal
Updated on

Annapurna Devi Temple :

देवी देवतांच्या मंदिरात लाखो रूपयांचे सोने, नाणे दान केले जाते. दक्षिणभारतातील तर अनेक मंदिरे सोन्यानेच मढवलेली आहेत. त्यावर नेहमीच टिका होत असते. की एवढा पैसा लोकांच्या सेवेत का वापरत नाहीत. पण, शेवटी ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा आणि विचारांचा विषय आहे.

भोपाळमध्ये असं एक मंदिर आहे जिथे देवीला फुल,नारळ पेढे नाहीतर सॅनिटरी पॅड चढवले जातात. लोक हे श्रद्धेने आणि चांगल्या भावनेने देत आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जात नाही. याचं कारणही तसंच आहे.

भारताला प्राचिन मंदिरांचा देश म्हटलं जातं. भारतात प्रत्येक गावात एक ग्रामदैवत असतेच. त्याची यात्रा, उत्सवात निष्पाप जीवाचा बळी दिला जातो. तर काही ठिकाणी अधिकच विचित्र प्रथा आहेत. पण या अन्नपूर्णा मंदिराची बातच न्यारी म्हणावी लागेल!

Annapurna Devi Temple
Shri Ram Temple : रामलल्लासाठी सुवर्ण सिंहासनाचा थाट

मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये आरेरा कॉलोनी E-5 येथे हे मंदिर आहे. या मंदिरात अन्नपूर्णा देवीची सुरेख मूर्ती विराजमान आहे. इथे देवीला गोडाधोडाचे पदार्थ किंवा फुलांचा हार नाही, तर सॅनिटरी पॅड अर्पण केले जातात.

हेशेल फाऊंडेशन, भोपाळचे संचालक दीपांश मुखर्जी यांनी सांगितले की अन्नपूर्णा देवी मंदिरात दान केलेले सॅनिटरी पॅड आणि मेन्स्ट्रूअल कप, कुटुंब नियोजन असोसिएशन, यांच्या मदतीने भोपाळच्या झोपडपट्टी भागात आणि मुलींच्या सरकारी शाळांमध्ये वितरित केले जातात.

सॅनिटरी पॅड वाटपाची कल्पना आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरातून आली, जिथे अंबोवाची उत्सव होतो. तिथे ही संस्था मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता यावर काम करते.

Annapurna Devi Temple
Dakini Temple : सायंकाळी ६ नंतर या मंदिरात काय घडतं? कोणासही प्रवेश करण्यास आहे मनाई

पुढे ते म्हणाले, ‘बाजारात ताज्या फुलांची किंवा हारांची किंमत साधारण 100 रुपयांवर जाते. परंतु दुसऱ्या दिवशी ही फुलं कोमजतात. मग देवीला अर्पण केलेली हीच फुलं आम्हाला नाईलाजाने कचरापेटीत टाकावी लागतात. तर, मिठाई लोकांमध्ये वाटली जाते.

तीसुद्धा खाण्याची काही तासांचीच मर्यादा असते. या सगळ्याचा विचार करूनच आम्ही भाविकांचे पैसे चांगल्या कामासाठी खर्च व्हावे या हेतूने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आम्ही भाविकांच्या भावना, श्रद्धा जाणतो, परंतु वायफळ खर्च करणं चूकीचं आहे.

Annapurna Devi Temple
Divorce Temple : इथे आहे घटस्फोटाचं मंदिर, १२ व्या शतकातल्या अत्याचारीत महिलांचा निवारा

अन्नपूर्णा देवी मंदिरात मागील 4 महिन्यांत 11 हजारांहून अधिक सॅनिटरी पॅड्स जमा झाले. भारतात महिन्याला कोट्यवधी मुली आणि महिलांना पाळी येते, त्यामानाने हा आकडा फार कमी आहे. परंतु दुर्गम भागातील मुली आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छता पाळता यावी यासाठी केलेला हा एक लहानसा प्रयत्न आहे’, असं मुखर्जी यांनी सांगितले.

अन्नपूर्णा देवी मंदिरात राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाबाबत विविध स्तरांमधून कौतुक होत आहे. तसंच सॅनिटरी पॅड किंवा मेन्स्ट्रुअल कप देवीच्या गाभाऱ्यात अर्पण करण्याची आवश्यकता नाही. मंदिर समिती मंदिरात किंवा मंदिराबाहेर एखाद्या विशिष्ट ठिकाणीदेखील ते जमा करून घेऊ शकते, कारण अंधश्रद्धा नाही पण श्रद्धा महत्त्वाची, असं मतदेखील अनेकजणांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.