Ants Control: घर झाडंल तर नुसत्या मुंग्याच पडतील; या उपायांनी मुंग्या घर सोडून पळतील!

lal and kali mungi upay: 'या' उपायांनी मुंग्यांना पळवून लावा
Ants Control: lal and kali mungi upay
Ants Control: lal and kali mungi upayesakal
Updated on

Ants Control: आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याच्या घरात मुंग्या नसतील. घराच्या कानाकोपऱ्यापासून स्वयंपाकघर आणि पलंगापर्यंत काळ्या-लाल मुंग्यांची दहशत असते. मुंग्या गोडाच्या शोधात येतात, त्यामूळे गुळ, साखरेच्या डब्याभोवती तर हमखास मुंग्यांचा वावर असतो.

बहुतेक वेळा मुंग्या घरात आणि बागेत तळ ठोकून राहतात. त्यांच्या चाव्यामुळे वेदना होतात, तर काहींना ऍलर्जी देखील होते. लोक कीटकनाशके वापरून शक्य तितक्या लवकर त्यांची सुटका करतात.

परंतु प्रत्यक्षात ते लहान मुले, पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक आहे. त्याचमुळेच मुंग्या बाहेर घालवण्यासाठीचे उपाय काय आहेत ते पाहुयात. (Ants Control: Ants have created panic in the house? Know how their entry will be banned)

Ants Control: lal and kali mungi upay
Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये तुमच्याकडून नकळत झालेल्या या चूका घर उध्वस्त करू शकतात!

लाल मुंग्या दिसायला तर छोट्या असतात, पण नाकी नऊ आणण्याबाबत भल्याभल्यांना भारी पडतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तर मुंग्या हैराण करून सोडतात. घरातील कानाकोपऱ्यात मुंग्या दिसतात.

'या' उपायांनी मुंग्यांना पळवून लावा

मीठ

मीठ घरात जिथे मुंग्या येतात तिथे मीठ शिंपडावे. मुंग्यांना पळवून लावण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. हवे असल्यास मीठ पाण्यात उकळून हे द्रव बाटलीत भरून फवारणी करावी, यामुळे मुंग्यांच्या प्रवेशाला पूर्णविराम मिळेल.

लिंबू

आणि त्याची साल मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते. जमिनीवर पोचा ठेवताना त्याच्या पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्यावा. मुंग्यांना त्याचा वास आवडत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाची साल घराच्या कोपऱ्यात ठेवू शकता.

व्हाईट

व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर स्प्रे बॉटलमध्ये पांढरा व्हिनेगर टाकून मग त्यात पाणी मिसळून मुंग्या ये-जा करतात तिथे शिंपडावे. व्हिनेगरच्या वासापासून मुंग्या पळून जातात.

Ants Control: lal and kali mungi upay
Kitchen Tips: सुकलेली लिंब फेकून देताय तर थांबा, किचनमध्ये असा करा वापर

काळी मिरी

काळी मिरी मुंग्यांना मिठाई आवडते हे कमी ज्ञात आहे, म्हणून ते त्यांच्या शोधात कोठेही येतात, तर हा किडा तीक्ष्ण आणि कडू गोष्टींचा तीव्र तिरस्कार करतो. त्यामुळे मुंग्या येण्यासाठी वाटेत काळी मिरी पावडर किंवा काळी मिरी फवारणी करावी. (Spices)

साबण आणि पाणी

एका भांड्यात पाणी आणि डिश वॉश बार घ्या. त्या पाण्यात साबण विरघळला की ते पाणी एका बाटलीत भरुन ठेवा. जेव्हा तूम्हाला मुंग्या दिसतील तेव्हा हे पाणी त्यांच्यावर शिंपडा.

Ants Control: lal and kali mungi upay
Ants Prevention: मुंग्यांमुळे हैराण आहात? मग हे घरगुती उपाय करा आणि मुंग्या पळवा

लवंग

लवंगाचा वापर मुंग्या तसंच किडे देखील दूर करण्यासाठी केला जातो. लवंगाचा वास खूप तीव्र असतो, त्यामुळे मुंग्या आणि किडे लगेच नाहीशे होतात. यासाठी ज्या ठिकाणी मुंग्या असतील तिथे लवंगाचे ३ ते ४ काड्या घाला. मुंग्या लवंगाच्या वासाने लगेच नाहीश्या होतील. (Ants Removing Tips)

दालचीनी

मुंग्यांना घरातून पळवून लावण्यासाठी दालचीनीही फायदेशीर ठरते. यासाठी दालचीनी आणि लवंग एकत्र मुंग्या लागतात तिथे ठेवा. घरात जिथे जिथे मुंग्यांची घरं आहेत तिथे दालचीनी पावडर आणि लवंग ठेवा. तुम्ही दालचीनी आणि लवंगच्या एसेंशिअल ऑइलचाही वापर करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.