Happy Holi 2022 : दरवर्षी फाल्गून महिन्यामध्ये पोर्णिमेला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी १८ मार्चला होळाचा सण साजरा केला जाणार आहे. त्याआधी एक दिवस आधी होळी पेटवली जातेय होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि सर्व मत-भेद विसरून एकमेकांची गळाभेट घेतात. पण, जगभरामध्ये कोरोना संक्रमनामुळे होळी साध्या पध्दतीने साजरा करण्याचा सल्ला दिला जात आहे पण, तुम्हाला कोरोना येण्यापूर्वी जेव्हा होळी देशातील सर्व ठिकाणी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. रंगाचा(Colours) सण वेगवेगळ्या नावांनी परदेशांमध्ये साजरा केला जातो. परदेशांमध्ये होळीबाबत वेगवेगळ्या मिथ्य आणि कथा आहे. चला त्याबाबत जाणून घेऊ या...
भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये जवळपास सगळे सण साजरे केले जातात जे आपल्याकडे साजरे करतात. पण होळीचा एक वेगळा अंदाज असतो. होळीला येथे फागु पुन्हि म्हणतात, ज्याचा उच्चार फाल्गुनी पोर्णिमा प्रमाणे असल्यासारखे वाटते. येथे राजेशाही सुरू असताना राजवाड्यात बांबूचे खांब गाडून सुरुवात झाली होत असे ती आठवडाभर चालत असे. डोंगराळ भागात होळी भारताच्या एक दिवस आधी साजरी करतात, तर तराई होळी भारतासोबत आणि आपल्यासारखीच साजरी करतात.
म्यानमारमध्ये होळीसोबत मिळता जुळता सण मेकांग साजरा केला जातो. काही ठिकाणी याला थिंगयान असेही म्हटले जाते. या दिवशी लोक एकमेकांवर पाण्याचा वर्षाव करतात आणि त्यामुळे सर्व पाप धुतले जातात असेही मानतात. गेल्या काही वर्षांमध्ये पाणीशिवाय येथे रंगाचे खेळ देखील खेळले जातात.
थायलँडमध्ये होळीच्या सणाला साँगक्रान असे म्हणतात. या दिवशी लोक बौद्ध मठांमध्ये जाऊन भिक्षूकांकडून आशीर्वाद घेतात आणि एकमेकांवर अत्तराच्या पाण्याचा वर्षाव करतात.
समुद्र किनारी आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण मॉरिशिअसमध्ये होळी वसंत पंचमीला सुरु होते आणि जवळपास महिनाभर असते. येथे सुद्धा होळी पेटवली जाते. या काळात तेथे जाणाऱ्या पर्यटकांना होळीच्या उत्सवाचा आनंद घेता येतो. तसेच कित्येक भागांमध्ये पाण्याचा वर्षाव देखील केला जातो.
पोलंडमध्ये होळीच्या वेळी अर्सीना नावाचा सण साजरा केला जातो. हा होळीप्रमाणे रंगाचा उत्सव असतो. येथे लोक फुलांच्या रंगानी आणि अत्तरांनी होळी खेळतात आणि एकमेकांची गळाभेट घेतात. पोलंडमध्ये या दिवशी शत्रूत्व विसरण्यासाठीचा सण म्हणून पाहिले जाते.
स्पेनमध्ये बुनोल शहरामध्ये प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये टोमाटीन फेस्टिवल साजरा केला जातो. त्यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येथे टॉमेटोची होळी खेळतात. पण या दिवशी कोणी धार्मिक महत्त्व नाही पण, या टॉमेटो फेस्टिवलची धूमधामची तुलना भारतातील होळीसोबत केली जाते.
रोममध्ये होळीप्रमाणे एक सण आहे,ज्याला रेडिका म्हणतात. पण हा सण मे महिन्यामध्ये साजरा केला जातो. रंग खेळण्याआधी रात्री येथे मुली एकत्र येऊन होळी पेटवतात. ज्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी लोक त्याच्या भोवती नाचत रंग खेळतात. तसेच फुलांचा वर्षाव केला जातो.हिटलीमध्ये असे मानले जाते की ती धान्याची देवता फ्लोरा हिची कृपा असते आणि चांगले पीक देते.
अफ्रिकेमधील देशांमध्ये होळी पेटविण्याची परंपरा आहे. अशीच एक परंपरा ओमेना बोंगा असे म्हणतात. या दिवशी आग पेटवून अन्न देवतेचे स्मरण केले जाते आणि रात्रभर जळती-विझत्या आगीच्याभोवती लोक नाचतात -गातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.